बेरोजगार उमेदवारांसाठी प्लेसमेंट ड्राईव्ह (जागेवर निवड संधी)चे आयोजन उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत
रायगड,दि.16 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्या मार्फत गुरुवार दि. 18 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वैभव निवास, भंडार आळी, चेंढरे अलिबाग-रायगड येथे जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी Placement Drive (जागेवर निवड संधी ) चे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र, रायगड-अलिबागच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या भरतीसाठी Placement Drive (जागेवर निवड संधी) साठी पुढील आस्थापनाचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. 1) आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत अलिबाग यांच्या जिल्हयातील विविध आस्थापनेवर विविध शाखेतील पदवीधर उमेदवारांसाठी Junior Officer-4, Asst Manager-4 या पदासाठी, 2) रॅडिसन ब्लू रिसॉर्ट आणि स्पा, अलिबाग यांच्या आस्थापनेवर हॉटेल मॅनेजमेंन्ट पदवी किंवा पदवीधर उमेदवारांना F&B Attendant-5 या पदासाठी, 3) श्रीराम फायनान्स यांच्या आस्थापनेवर विविध शाखेतील पदवीधर पात्र उमेदवारांना Branch Manager-1, Accountant-3, Back Office-3 व तसेच 4) मयूर बेकरी आणि कन्फेक्शनरी,अलिबाग, यांच्या आस्थापनेवर HR-1 या पदासाठी 5) बेकबेस्ट फूड प्रा.लि. खोपोली यांच्या आस्थापनेवर Operator-15 या पदासाठी अशी एकूण 36 पदांसाठी प्रत्यक्ष उमेदवारांची जागेवर निवड केली जाणार आहे.

या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील Employment – Job Seeker (Find A Job) – Job Seeker Login या क्रमाने जाऊन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहीती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शन मधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-I Agree व दिसणाऱ्या विविध पदांना आपल्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे.
Placement Drive च्या रिक्तपदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्र –02141-222029 किंवा. महेश भा.वखरे, लिपिक-टंकलेखक यांचे 9421613757 या दुरध्वनी क्रमांकावर वर संपर्क साधावा.