जालना,दि. 2 :– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारक स्ट्रक्चरमध्ये कोणताही बदल न करता संशोधन केंद्र, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, ध्यानकेंद्र व प्रेक्षकगृह इ.मध्ये काही नवीन सूचना मिळण्याकरीता समाजातून तज्ञ व्यक्ती तथा जाणकार व्यक्तींची समिती गठीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विभागामधुन विविध क्षेत्रातील किमान 50 व्यक्तींची नावे कळविण्याबाबत निर्देश आहेत.

त्यानुषंगाने विविध क्षेत्रातील अनुभवी, तज्ञ तथा जाणकार व्यक्तींनी त्यांचेकडील असलेल्या अनुभवाबाबत, माहितीबाबतचा अहवाल सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी कार्यालयास दि. 12 सप्टेंबर 2022 पर्यंत सादर करावा, जेणेकरुन आपली नावे शासनास पाठवता येतील, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.









