भारतीय डाक विभागाची ‘गोल्ड बॉन्ड’ योजना …

भारतीय डाक विभागाची ‘गोल्ड बॉन्ड’ योजना …

अकोला, दि.२३(आजचा साक्षीदार) – रिझर्व बॅंक ऑफ इंडीया द्वारा संचलित ‘सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड योजना’ दि.२२ते २६ ऑगस्ट या दरम्यान भारतीय डाक विभाग मार्फत राबविण्यात येत आहे, या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन प्रवर अधीक्षक, डाकघर, अकोला डाकविभाग अकोला यांनी केले आहे.

असे आहे योजनेचे स्वरुपः या योजने मध्ये अगदी एक ग्राम सोन्या पासून ते ४ किलो ग्राम पर्यंत गुंतवणूक करता येते. एक ग्राम गोल्ड बॉन्ड चा दर हा ५ हजार १९७ रुपये इतका आहे. या योजने मध्ये गुंतवणूकदाराना वार्षिक अडीच टक्के दराने व्याज मिळते. दर सहा महिन्यांनी व्याजाची रक्कम मिळते. यात प्रत्यक्ष सोन्याप्रमाणे जीएसटी किंवा मेकिंग चार्जेस लागत नाहीत. गुंतवणुकीवर कॅपिटल गेन टॅक्स आकाराला जात नाही. या योजनेचा परिपक्वता कालावधी आठ वर्ष असून पाच ते सात वर्ष कालावधी दरम्यान मुदतपूर्व बॉन्ड बंद करता येतो. परिपक्वतेच्या वेळेस सोन्याच्या विद्यमान बाजारभावाची हमी, तसेच त्या व्यतिरिक्त नियमित व्याज सुद्धा मिळते.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डाक विभागाने म्हटले आहे की, ‘सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड’ हा गुंतावणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. त्यामुळे जोखीम कमी होते.

आवश्यक कागदपत्रे: पॅनकार्ड, आधार कार्ड, बँक पासबूक/ Cancelled Cheque. ही योजना अकोला डाक विभागातील सर्व डाकघरांमध्ये उपलब्ध असून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रवर अधिक्षक डाकघर अकोला विभाग, अकोला यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment