भारतीय रेल्वे च्या तिकीट बुकिंग तसेच कोच कोड मध्ये मोठे बदल ! - जाणून घ्या खूप महत्वाचे अपडेट | Vistadome Coach Indian Railwaysभारतीय रेल्वे च्या तिकीट बुकिंग तसेच कोच कोड मध्ये मोठे बदल ! - जाणून घ्या खूप महत्वाचे अपडेट | Vistadome Coach Indian Railways

भारतीय रेल्वे च्या तिकीट बुकिंग तसेच कोच कोड मध्ये मोठे बदल ! – जाणून घ्या खूप महत्वाचे अपडेट | Vistadome Coach Indian Railways

भारतीय रेल्वेने आता तिकिट बुक करण्याच्या पद्धतीत तसेच तिकीट बुकिंग कोड आणि कोच कोड मध्ये हि काही बदल केले आहे – रेल्वेने आपल्या गाड्यांमध्ये नव्या प्रकारचे कोच सुरू केल्यामुळे हे बदल केले आहेत. यामुळे आता आपल्याला रेल्वे चे तिकीट बुक करताना आपल्या आवडीचे सीट आरामात मिळणार आहे. तसेच, भारतीय रेल्वे ने देशभरातल्या कित्येक मार्गांवर व्हिस्टाडोम कोच (Vistadome Coach Indian Railways)असलेल्या गाड्या सुरू केल्या आहेत यामुळे कोड सिस्टिममध्ये बदल केले आहेत

काय सांगितले आहे याबाबत इंडियन रेल्वे ने ? – इंडियन रेल्वेने दिलेल्या माहितीप्रमाणे – व्हिस्टाडोम कोच (Vistadome Coach Indian Railways) सोबतच एसी – ३ टायरच्या इकॉनॉमी क्लासचाही समावेश करण्यात आला आहे. या कोचमध्ये सुमारे 83 बर्थ उपलब्ध असणार आहेत – तसेच थर्ड एसीच्या इकॉनॉमी कोचसाठी बुकिंग कोड 3E असणार आहे – तर कोच कोड हा M असणार आहे

काय आहे व्हिस्टाडोम कोच ? – व्हिस्टाडोम कोच (Vistadome Coach Indian Railways) हे विशेष कोच आहे- या डब्यांचे छत हे काचेचे असल्यामुळे यातून बाहेरचे दृश्य पाहता येणार आहे – सध्या मुंबई ते गोव्यादरम्यान असणाऱ्या दादर-मडगाव मार्गावरील गाडीत हा व्हिस्टाडोम कोच उपलब्ध आहे

असे असतील नवे कोच आणि बुकिंग कोड्स – व्हिस्टाडोम (Vistadome Coach Indian Railways) एसी कोचसाठी EV हा कोड असणार आहे – तसेच व्हिस्टाडोमचा बुकिंग कोड V.S. असणार आहे, तर कोच कोड AC DV असणार आहे.

● तसेच स्लीपर कोचसाठी बुकिंग कोड S.L., तर कोच कोड S असणार आहे – एसी चेअरकारसाठी बुकिंग कोड C.C., आणि कोच कोड C असणार आहे – तसेच थर्ड एसीचा बुकिंग कोड 3A, तर कोच कोड B असणार आहे

● याचबरोबर सेकंड एसीचा बुकिंग कोड 2A, तर कोच कोड A असणार आहे – तसेच गरीब रथमधील एसी थ्री टायरचा बुकिंग कोड 3A, तर कोच कोड G असणार आहे – गरीब रथ चेअरकारचा बुकिंग कोड CC आणि कोच कोड J असणार आहे.

● तसेच फर्स्ट एसीचा बुकिंग कोड 1A आणि कोच कोड H असणार आहे – एक्झिक्युटिव्ह क्लासचा बुकिंग कोड E.C, तर कोच कोड E असणार आहे – अनूभुती क्लासचा बुकिंग कोड E.A, आणि कोच कोड K असणार आहे.

● फर्स्ट क्लास कोचचा बुकिंग कोड F.C, तर कोच कोड F असणार आहे – तसेच व्हिस्टाडोम (Vistadome Coach Indian Railways) एसी चा कोच कोड E.V आणि बुकिंग कोडही E.V असणार आहे – असे रेल्वे विभागाने सांगितले