सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थांकडून प्रस्ताव मागविले | 10 जानेवारी अंतिम मुदत
0 0
Read Time:3 Minute, 30 Second

भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण | 25 जानेवारी रोजी मुलाखतीस हजर रहावे

कोल्हापूर, दि. 17 : राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंम्बाईनड डिफेन्स सर्व्हिस (CDS) परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दिनांक 1 फेब्रुवारी ते 15 एप्रिल 2024 या कालावधीत CDS कोर्स क्र. 62 आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे दि. 25 जानेवारी 2024 रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल माने (निवृत्त) यांनी केले आहे.

सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थांकडून प्रस्ताव मागविले | 10 जानेवारी अंतिम मुदत
भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण | 25 जानेवारी रोजी मुलाखतीस हजर रहावे

कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील CDS -62 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खालील नमूद पात्रता आवश्यक असून त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावे :- उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, उमेदवाराने लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. (CDS) या परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज केलेला असावा.

अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी : training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. आणि 0253-2451032 किंवा व्हॉटस्अॅप क्र. 9156073306 (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल माने यांनी केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *