भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती सन 2022-23 चे प्रलंबित अर्ज महाविद्यालयांनी 30 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
हिंगोली, दि. २५ (आजचा साक्षीदार) : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती सन 2022-23 प्रक्रिया ऑनलाईन राबविली जात आहे. ही प्रक्रिया महाडिबीटी प्रणालीद्वारे दि. 29 सप्टेंबर 2022 पासून सुरु आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या आवेदनावर महाविद्यालयांनी पुढील कार्यवाही करुन ते समाज कल्याण विभागाकडे पाठविणे अपेक्षित आहे. परंतु बहुतांश महाविद्यालयांनी बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या अर्जावर कार्यवाही केली नसल्याची बाब समोर आली आहे.
शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील 1445 अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असून सातत्याने पत्रव्यवहार, बैठका, Whats Group वरील संदेश याद्वारे सूचना देवूनही अर्ज मंजुरीबाबत कार्यवाही करत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
यातील सर्वात जास्त प्रलंबित महाविद्यालयामध्ये स्व. दत्तराव हैबतराव थोरात नर्सिंग स्कुल, हिंगोली यांचे 71 अर्ज, सरस्वती इन्टिटयुट ऑफ फार्मसी, कुर्तडी यांचे 52 अर्ज, एल.डी. एच.टी. स्कूल ऑफ नर्सिंग हिंगोली यांचे 44 अर्ज, आनंदीताई बेंगाळ नर्सिंग स्कुल, सेनगाव यांचे 40 अर्ज, बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमत यांचे 38 अर्ज, शिवाजी कॉलेज, हिंगोली यांचे 37 अर्ज, मॉडर्न हायर सेकंडरी स्कूल, वसमत यांचे 36 अर्ज, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, हिंगोली यांचे 36 अर्ज, शंकरराव सातव विद्यालय, कळमनुरी यांचे 36 अर्ज, भारतरत्न नानाजी देशमुख वरिष्ठ महाविद्यालय गोरेगाव, सेनगाव यांचे 34 अर्ज, कृषितंत्र निकेतन गोरेगाव, सेनगाव यांचे 27 अर्ज, इंदिरा गांधी नर्सिंग स्कूल जीएनएम वसमत यांचे 26 अर्ज प्रलंबित आहेत.
सर्व महाविद्यालयांनी आपणाकडे पा्रत असलेले प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज 30 जानेवारी, 2023 पर्यंत पाठवावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.