0 0
Read Time:3 Minute, 47 Second

सांगली, दि. 06,: भारत निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक जोडणी करण्याचा कार्यक्रम जाहीर केला असून या कार्यक्रमाची अंमलबजावणी दि. 1 ऑगस्ट 2022 पासून लागू झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 11 सप्टेंबर 2022 रोजी पहिले विशेष शिबीर तसेच दुसरे विशेष शिबीर दि. 2 ऑक्टोबर 2022 रोजी सर्व मतदान केंद्रावर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरांदिवशी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदान केंद्रावर उपस्थित राहणार असून संबंधित मतदान केंद्र क्षेत्रातील अद्याप आधार जोडणी न केलेल्या मतदारांनी त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या मतदान ओळखपत्रास आधार क्रमांक जोडणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक जोडणीसाठी सर्व मतदान केंद्रावर 11 सप्टेंबर व 2 ऑक्टोबर रोजी विशेष शिबीर – जिल्हाधिकारी • मतदारांनी बीएलओशी संपर्क साधून मतदान ओळखपत्रास आधार क्रमांक जोडणी करून घ्यावी

विद्यमान मतदारांकडून आधार संकलनाचा उद्देश मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आहे. मतदार यादीतील विद्यमान मतदारांनी त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज क्र. 6ब मध्ये अर्ज मतदार नोंदणी अधिकारी / सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा आहे. अर्ज क्र. 6ब भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तसेच मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6ब ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध आहे.

भारत निवडणूक आयोगाने विकसीत केलेल्या पोर्टल / ॲपच्या माध्यमातून मतदार ऑनलाईन पध्दतीने अर्ज क्र. 6ब भरून आधार क्रमांक नोंदवू शकतो आणि UIDAI कड़े नमुद असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त OTP द्वारे आधारचे प्रमाणीकरण करु शकतो. तसेच जर मतदारास स्व-प्रमाणीकरण करावयाचे नसल्यास मतदार त्याचा स्व-प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाईन पध्दतीने अर्ज क्र. 6ब भरून त्यासोबत योग्य दस्तावेज सादर करू शकतो. जर मतदाराकडे आधार क्रमांक नसेल आणि त्यामुळे त्याचा / तिचा आधार क्रमांक सादर करता येत नसेल तर मतदाराला नमुना अर्ज क्र. 6ब मध्ये नमूद केलेल्या अकरा पर्यायी कागदपत्रांपैकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *