महाज्योतीचे मोफत सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण | दीड हजार विद्यार्थ्यांना लाभ ; प्रतीमाह 10 हजार विद्यावेतनमहाज्योतीचे मोफत सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण | दीड हजार विद्यार्थ्यांना लाभ ; प्रतीमाह 10 हजार विद्यावेतन

महाज्योतीचे मोफत सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण | दीड हजार विद्यार्थ्यांना लाभ ; प्रतीमाह 10 हजार विद्यावेतन

हिंगोली १५ मे २०२३ (आजचा साक्षीदार) – : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण (महाज्योती) संस्था, इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्यातील दीड हजार युवकांना मोफत मिलिटरी भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणासाठी मंजूर विद्यार्थी संख्या 1500 ठेवण्यात आली आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असणार आहे. या कालावधीत 75 टक्के उपस्थितीच्या अटीवर प्रशिक्षणार्थ्यास दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. आकस्मिक निधी एकवेळ 12 हजार रुपयाची तरतुद करण्यात आलेली आहे. सदर प्रशिक्षण पुणे येथे घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 28 मे ठेवण्यात आलेली आहे.

हे प्रशिक्षण इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन, अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी 12 वी उत्तीर्ण व वैद्यकीय अर्हता पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या mahajyoti.org.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अंतिम निवडीसाठी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा तसेच संस्थेच्या 0712-2870120/21 या क्रमांकवर संपर्क करण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *