महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभ योजनेसाठी आधार क्रमांक बँक खात्याला लिंक करणे आवश्यक – जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण

यवतमाळ, दि 30 ऑगस्ट 22 : सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या वर्षात कर्ज घेऊन त्याची विहीत मुदतीत नियमित परतफेड करणा-या शेतक-यांसाठी शासन निर्णय दिनांक २९ जुलै, २०२२ नुसार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रु. ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. योजनेच्या निकषानुसार योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र असलेल्या शेतक-यांचा आधार क्रमांक बँकेच्या खात्यास लिंक असणे आवश्यक असल्याने नियमित कर्ज परतफेड करणा-या ज्या शेतक-यांनी बँक खात्यांना आधार क्रमांक लिंक केलेला नाही अशा शेतक-यांनी संबंधीत बँकेकडे तसेच संबंधीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे गटसचिव यांच्याकडे संपर्क साधुन आधार कार्डची छायांकीत प्रत तात्काळ उपलब्ध करुन द्यावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभ योजनेसाठी आधार क्रमांक बँक खात्याला लिंक करणे आवश्यक – जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण

सदर योजनेची अंमलबजावणी तातडीने व अचुक होण्यासाठी योजनेच्या कार्यपध्दतीबाबत जिल्हयातील सर्व राष्ट्रीयकृत/व्यापारी बँकांचे जिल्हा समन्वयक, विदर्भ कोकण ग्रामिण बँकेचे जिल्हा समन्वयक, जिल्हा अग्रणी प्रबंधक, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विशेष कार्य अधिकारी (कर्जमाफी विभाग) यांची कार्यशाळा दिनांक २५.०८.२०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ यांनी योजनेच्या निकषांबाबत व अंमलबजावणीच्या कार्यपध्दतीबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यशाळेस जिल्हा अग्रणी प्रबंधक, यवतमाळ, विशेष कार्य अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. यवतमाळ तसेच राष्ट्रीयकृत व ग्रामिण बँकेचे जिल्हा समन्वयक उपस्थीत होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment