राहुरी, दि. २३ (आजचा साक्षीदार) – महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय सोनई आयोजित आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा सन २०२२-२३ कृषी महाविद्यालयाच्या बास्केटबॉल मैदानावर पार पडल्या.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज पार पडला या स्पर्धेमध्ये मुलांच्या संघामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट राहुरी या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तर कृषी महाविद्यालय सोनई या संघाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले, कृषी महाविद्यालय अकलूज या संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. मुलींच्या संघांमध्ये कृषी महाविद्यालय तळसंदे या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, कृषी महाविद्यालय फलटण या संघाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक तर कृषी महाविद्यालय अकलूज या संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.
सर्व विजयी संघाना पारितोषिक वितरण जिल्हा क्रिडा अधिकारी मा.सौ.भाग्यश्री बिले मॅडम, मा.डॉ.महावीरसिंग चौहाण सर, मा.प्रा.दिलीप गायकवाड सर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.