महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर – ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण || Maharashtra SSC Board 10th Result 2020
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (SSC) मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्यातल्या एकूण नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. मार्च २०२० मध्ये झालेल्या या परीक्षेत एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमधे कोकण बोर्डाची टक्केवारी सर्वाधिक आहे तर राज्यातील ८,३६० शाळांचा निकाल हा १०० टक्के लागलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण १७ लाख ९ हजार २६४ विद्यार्थ्यांनी मार्च २०२० मध्ये परीक्षा दिली होती, त्यापैकी एकूण १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मार्च २०२० दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात एकूण 96.91 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. ह्या वर्षी ३.१ % नी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. दहावीच्या निकालात कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
यंदाच्या दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये –
- – कोकण विभाग अव्वल ९८.७७ टक्के विध्यार्थी उत्तीर्ण
- – औरंगाबाद सर्वात कमी ९२ टक्के विध्यार्थी उत्तीर्ण
- – २०१९ या वर्षीच्या तुलनेत निकालात २०२० मध्ये १८.२० टक्के इतकी वाढ.
- – राज्यातील सर्व विभागातील एकूण २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
2020 दहावीचा निकाल एका दृष्टिक्षेपात –
- परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी संख्या – १७ लाख ६५ हजार ८९८
- परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी संख्या – १७ लाख ९ हजार २६४
- एकूण उत्तीर्ण विद्यार्थी संख्या – १५ लाख १ हजार १०५
पुढील संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल –
आज दुपारी १ वाजता ऑनलाइन दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. आपण खालील लिंक वर भेट देऊन आपला निकाल पाहू शकता.
या वर्षी कसे दिले जाणार भूगोलाचे व सामाजिक शास्त्रे पेपर – २ चे गुण?
दहावीच्या भूगोल विषयाची परीक्षा २३ मार्च २०२० रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नियोजित केलेली होती; मात्र ती करोना विषाणू च्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती. तसेच त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयांच्या परीक्षाही राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयात सरासरी गुण देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. बोर्डाच्या परिपत्रका नुसार, सामाजिक शास्त्रे पेपर – २ या विषयाचे गुणदान हे सरासरीने होणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेत त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी लक्षात घेऊन त्याचे गुणांत रुपांतर करून त्यानुसार गुण दिले जातील.
तसेच अन्य विषयांना लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची सरासरी काढून, त्यानुसार भूगोल विषयाचे गुण दिले जातील. तसेच दिव्यांगासाठी असणाऱ्या कार्यशिक्षण विषयाचे गुण ही सरासरी पद्धतीने दिले जाणार आहेत. भूगोलाचा पेपर झाला होता रद्द
((सूचना : परीक्षा रद्द झालेल्या विषयांच्या गुणांच्या सदरील माहिती साठी मंडळाचे अधिकृत परिपत्रकच ग्राह्य धरावे.))
गुणपडताळणी / छायाप्रती / पुनर्मूल्यांकन प्रक्रिया :
ऑनलाइन निकाला जाहीर झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना श्रेणी व्यतिरिक्त कोणत्याही अनिवार्य विषयांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
गुणपडताळणी / छायाप्रती / पुनर्मूल्यांकन प्रक्रिया करीत विद्यार्थी-पालकांना
http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळेमार्फत अर्ज करता येऊ शकेल. यासाठी आवश्यक अटी व सूचना मंडळाच्या संकेतस्थळावर दिल्या आहेत. या प्रक्रियांसाठी शुल्क असून ते शुल्क देखील ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.
प्रकिया संबंधीत महत्त्वाच्या तारखा :
- गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत – ३० जुलै २०२० ते ८ ऑगस्ट २०२०
- छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत – ३० जुलै २०२० ते १८ ऑगस्ट २०२०
हि महत्वाची बातमी आपणास आवडल्यास आणि महत्वाच्या लिंक आपल्या सर्व मित्रांना लगेच शेयर करा.