महाशिवरात्रिसाठी बाजारात आता सर्टिफाईड रुद्राक्ष व रत्ने ! आधुनिक पूजा सामुग्री.
त्र्यंबकेश्वर ता. 5 फेब्रुवारी (आजचा साक्षीदार) – जश जशी महाशिवरात जवळ येत आहे तस तसे बाजारात आता आधुनिक पूजा सामग्री विक्रीस येवू लागली आहे.नाही बाजारात मिळणाऱ्या वस्तू खऱ्या की खोट्या यावरून अनेकदा गोंधळाची परिस्थिती असते. आता सर्टिफाईड प्रामाणित केलेल्या वस्तूंना मागणी होत आहे.रुद्राक्ष आणि रत्न चांगल्या चांगल्याना सहज ओळखता येत नाही.
अशा परिस्थितीत बाजारात सर्टिफाइड रत्ने आणि सर्टिफाइड रुद्राक्ष विक्रीसाठी आले आहेत.आय ए एस.अथवा आयएसओ, असलेल्या वस्तू ,हॉल मार्क. असलेले सोने चांदी दागिने यांना बाजारात मागणी असते त्याच धर्तीवर वरील आहे.वाटते अर्थेत लॅबटेस्ट रिपोर्ट अशा वस्तूंना जोडलेला असतो त्यामुळे अशा वस्तू महागातच पडतात.
बाजारात सर्वच वस्तू हल्ली डुप्लिकेट मिळतात अशा परिस्थितीत संकल्पना पुढे आली.खरे तर विश्वास पात्रअशा ओळखीच्या दुकानदाराकडून खरेदी करणे योग्य असे अनेकांचे मत आहे.कागदपत्रांवर तरी कसा भरोसा ठेवायचा ? असे काही ना वाटते.
आधुनिक पूजा सामग्री – बाजारात मंत्र जपाचा रेडोओ भेटतो. जप करण्यासाठी 108 मण्यांची माळ भेटते तसेच काउंटिंग मशीन ही भेटते. देवासमोर लावण्यासाठी लाइटिंगची समई भेटते. तुळशी माळ बरोबर लाकडाच्या माळाही भेटतात. ग्राहकांनी आणि भाविकांनी सजगतेने खरेदी करणे ईष्ट आहे. स्वसताचे खरेदी करायचे की महागाची खरेदी करायचे . दुकानातून खरेदी करायचे की रस्त्यावरून खरेदी करायचे हे सर्वश्री ग्राहकावर यात्रेकरू भाविकांवर अवलंबून असते.