संभाजीनगर, दिनांक 27 : महिलांच्या तक्रारी, अडचणींची सोडवणूक, पिडितांना सुलभ मार्गदर्शन सुविधा होण्यासाठी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. राज्य, विभागीय स्तरावर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी, जिल्हास्तरावर तिसऱ्या आणि तालुकास्तरावर चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिन असतो.

त्यामध्ये महिलांनी त्यांच्या अडचणी, तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी केले आहे.