वाशिम, दि. 05 : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश प्रक्रीयेच्या माध्यमातून आरक्षीत जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

जात वैधता प्रमाणपत्रा अभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र मिळण्या साठी अर्ज सादर केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना ccvis या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करुन त्याची एक प्रत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिम या कार्यालयाकडे सादर करावी. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिमच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल यांनी केले.









