माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पेन्शन अदालतीचे आयोजन

दिव्यांगजन व्यक्ती हक्क अधिनियम 2016 तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी निवासी आयुक्तांसोबत आढावा बैठक

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पेन्शन अदालतीचे आयोजन

पुणे, दि. १५ : रक्षा लेखा प्रधान नियंत्रक कार्यालय यांच्यावतीने जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांच्या पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी कॅन्टीन इत्यादी बाबतच्या अडचणींचे निराकारण करण्यासाठी ८ व ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मिल्खासिंग पार्क, कमाण्ड एम. टी. समोर, घोरपडी, पुणे कॅम्प येथे पेन्शन अदालत व माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.

या सैनिक मेळाव्यास संरक्षण मंत्री, संरक्षण राज्य मंत्री संबोधित करणार असून सैन्य मुख्यालय, नवी दिल्ली, ई.सी.एच.एस., ए.डब्ल्यू.एच.ओ., राज्य सैनिक बोर्ड, जिल्हा सैनिक बोर्ड, रेकॉर्ड ऑफिसेस, सैन्य प्लेसमेंट नोड, पीसीडीए, पेन्शन, प्रयागराज येथील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सर्व रेकॉर्ड ऑफिसमार्फत मेळाव्यामध्ये स्टॉल लावण्यात येणार आहेत.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ | राज्य शासनाच्या अनुदान योजना व बीज भांडवल योजना | केंद्र शासनाची एनएसएफडीसी योजना
माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पेन्शन अदालतीचे आयोजन


मेळाव्यामध्ये उपस्थित राहण्यासाठी माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांना पेन्शन अदालत व माजी सैनिक यांनी हेडक्वार्टर दक्षिण महाराष्ट्र व गोवा सब एरिया हेल्पलाईन नंबर ८४८४०९४६०१ व कर्नल वेटरन, हेडक्वार्टर दक्षिण महाराष्ट्र व गोवा सब एरिया मोबाईल नंबर ९५४५४५८९१३ वर संपर्क साधावा.

तसेच पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी कॅन्टीन आदी बाबतच्या अडचणी असल्यास १७ जानेवारी पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे येथे उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील अर्ज तीन प्रतीत भरून कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), पुणे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment