वाशिम दि. 12 : महिला आर्थिक विकास महामंडळाकडून जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना विशेष विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इंटरनँशनल लेबर ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने स्पार्क हा पथदर्शी कार्यक्रम जिल्हात राबविण्यात येत आहे.” स्पार्क ” हा आंतरराष्ट्रीय कृषीविकास निधी (IFAD) चा एक महत्वकांक्षी प्रकल्प आहे.(लाईट फॉर दि वर्ल्ड), आंतरराष्ट्रीय कामगार संघटना व प्रोकासूट यांच्यासह एक संयुक्त पद्धतीने स्पार्क (SPARK) कार्यक्रम जगातील बुरकिना फासो,भारत, मोझांबिक आणि मालदिव या चार देशात राबविण्यात येत आहे.
देशात २०११ च्या जनगणनेनुसार एकूण २ कोटी ६८ लक्ष व्यक्ती दिव्यांग आहेत,जे एकूण लोकसंख्येच्या सुमारे २.२१ टक्के आहे.एकूण दिव्यांग व्यक्तींपैकी ५६ टक्के पुरुष आणि ४४ टक्के महिला आहेत.एकूण दिव्यांग व्यक्तींपैकी ६९ टक्के व्यक्ती ग्रामीण भारतात राहतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कृषीविकास निधी (IFAD) व्दारे भारतामध्ये विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता स्पार्क ( SPARK) हा प्रकल्प भारतामध्ये IFAD सहाय्यीत नवतेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्द्मा विकास प्रकल्प हा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमामध्ये प्रायोगिक तत्वावर जिल्हात राबविण्यात येत आहे.
स्पार्क (SPARK) कार्यक्रमामुळे दिव्यांग जणांना त्यांचे आयुष्य अधिक सुकरपणे जगण्याकरीता चांगली संधी प्राप्त होण्यास सहकार्य करणे, सर्वसाधारण लोकाप्रमाणे दिव्यांगाना मनुष्य म्हणून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. माविमच्या महिला बचत गटात दिव्यांग किवा त्यांच्या कुटुंबातील लोकांना बचतगटात सहभागी करून त्यांना आर्थिकदृष्टीने सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.तसेच सामाजिक स्वरूपात विकासाच्या प्रवाहात आणण्याकरीता दिव्यांगाप्रती विचारधारा बदलाचा प्रयत्न करण्यात येणार आहे. स्पार्क कार्यक्रमाकरिता जिल्हयात ११ दिव्यांग व्यक्तीची निवड ही दिव्यांगत्व समावेशन सुलभकर्त्या (DIF) म्हणून केली आहे. जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींच्या अडचणी जाणून त्याबाबत पुढील उपाययोजना करण्याकरीता धोरण ठरविणे याकरीता कार्य करतील.
या दिव्यांगत्व समावेशन सुलभकर्त्यांचे (DIF) प्रशिक्षण ८ ते १३ मे २०२३ दरम्यान आयोजित केले आहे.या प्रशिक्षणाकरीता आफ्रिका खंडातील युगांडा देशातून श्री.वोकोको इरिक,श्री. मुसॅनगु इवान हे तज्ञ मार्गदर्शक उपस्थित असून देशातील या पहिल्या पथदर्शी कार्यक्रमाचे उद्घाटन आभासी पद्धतीने ८ मे रोजी माविमच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.इंदू जाखर यांनी केले.माविमच्या महाव्यवस्थापक कुसुम बाळसराफ, लाईट फॉर द वर्डचे श्री.डेव्हिड,जेनेव्हा येथून इस्टबेन थ्रोमल,इफाडच्या मीरा मिश्रा,एरेल हालप्रेल,माविमच्या कार्यक्रम व्यवस्थापक गौरी दोंदे, माविम अमरावती विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मा. ईरिक सर – युगांडा,आय.एल.ओ. इंटरनॅशनल प्रोजेक्ट को -ऑर्डीनेटर श्रीमती रचना,समाज कल्याणच्या अधिक्षिका कल्पना इश्र्वरकर,माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माविम कार्यरत बचत गटाच्या संस्था लोकसंचालीत साधन केंद्रामधील प्रत्येकी १ या प्रमाणे ६ तालुक्यात ११ दिव्यांगत्व समावेशन सुलभकर्त्या (DIF) ची निवड केली असून हे दिव्यांगत्व समावेशन सुलभकर्त्या (DIF) दिव्यांग कार्यक्रमाबाबत अधिक जागृती व त्यावरील उपाययोजना करण्याकरीता प्रशिक्षित केले जात आहे. यावेळी सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख, सहायक सनियंत्रण अधिकारी कल्पना लोहकपुरे,राहुल मोकळे,गौरव नंदनवार,शरद कांबळे,संतोष मुख्माले,कार्तिक तायडे,श्रीमती रूपने,लता इंगळे,प्रदीप तायडे,प्रमोद गोरे,सीमा कोकरे,डीआयएफमध्ये लता कोरडे,अमोल जाधव,दत्ता राठोड,दत्ता गांजरे,राधिका भोयर, सुमित्रा रहाटकर,रेशमा,शिवानी, मांजरे आदी उपस्थित होते.