“मी प्रसिद्धीसाठी मनोरंजन विश्वात नाही. कधी-कधी मला शुभेच्छा आवडतात : अभिनेत्री राधिका आपटे
शॉर्ट फिल्म मुळे सर्व परिचित तसेच बॉलिवूड, वेब सीरिज विश्व गाजवणारी अभिनेत्री राधिका आपटे Radhika Apte च्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. या अप्रतिम अभिनेत्रीचं म्हणणं आहे की, “मी प्रसिद्धीसाठी मनोरंजन विश्वात नाही. कधी-कधी मला शुभेच्छा आवडतात. पण, मी यश आणि अपयशाला गांभीर्यानं घेत नाही. कारण यश-अपयश हे तात्पुरतं असतं आणि सर्व अगदी सापेक्ष आहेत. पण, आपण त्याकडे दुर्लक्षही करू शकत नाही. या आपल्या प्रवासामधील महत्त्वपूर्ण बाबी आहेत. तुम्हाला स्वत:चा कौतुक करुन घेणं आवडत असेल तर अपयशातून देखील शिकता आलं पाहिजे. म्हणून मी संतुलित दृष्टिकोन ठेवला आहे’. राधिका आपटे Radhika Apte नुकतीच नेटफ्लिक्सच्या ‘रात अकेली है’ या चित्रपट निमित्ताने माध्यमांशी बोलताना या भावना व्यक्त केल्या.
आपल्या उत्कृष्ट अभिनयानं विविध व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत्री म्हणून राधिका आपटेची ची ओळख आहे. अभिनयात ठसा उमटवणारी राधिका आपटे Radhika Apte आता दिग्दर्शनातही आपली छाप पाडू पाहतेय. राधिका आपटे नं ‘स्लीपवॉकर’ (Sleepwalkers) या लघुपटाद्वारे दिग्दर्शनात पाऊल टाकलं आहे. तसेच या ‘स्लीपवॉकर’ (Sleepwalkers) शॉर्टफिल्मची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. ‘पाल्म्स स्प्रिंग आंतरराष्ट्रीय शॉर्ट फेस्टिव्हल’मध्ये तिच्या या शॉर्ट फिल्मला ‘बेस्ट मिडनाइट शॉर्ट पुरस्कार’ हा पुरस्कार जाहीर झालाय. या लघुपटासाठी कथालेखनही राधिका ने स्वतः केलंय.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राधिका आपटे Radhika Apte म्हणाली, की ”शॉर्टफिल्मच्या दिग्दर्शनाच्या कामाचा मी खूप आनंद घेतला आणि मी याबाबत खूपच उत्सुक आहे. आमच्या प्रेक्षकांना ही शॉर्टफिल्म लवकरच पाहता येणार आहे. दिग्दर्शक म्हणून मला आणखी काम करण्याची संधी मिळेल.”