राष्ट्राला रक्तदानासारख्या रचनात्मक कार्याची गरज – जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार
कोरोना काळात रक्ताची मोठया प्रमाणावर आवश्यकता होती. त्यामुळे रक्तदानासारख्या रचनात्मक कार्याची राष्ट्राला गरज आहे. अशा कामासाठी शासकीय स्तरावरुन काही सहकार्य लागल्यास निश्चित करु, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.

विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा वर्धाच्या वतीने तात्या कुळकर्णी सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिका-यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी डॉ. शेषराव बावनकर, दिलीप जवदंड, सुनिल गावंडे, राजेश्वर जयपुरकर, राजेश कापसे, मोहन वडतकर, रुषीकेश खराटे, वैष्णवी मुडे, योगेद्र राठोड, अनेक नेपाडे आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या यावेळी 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले. चांगला उपक्रम घेतल्या बद्दल जिल्हाधिका-यांनी आयोजकांचे कौतुक केले. राष्ट्राला अशाच रचनात्मक कार्याची आवश्यकता आहे. अशा कार्यक्रमासाठी सहकार्य लागल्यास निश्चित करु. असे कार्यक्रम जिल्हयात वारंवार व्हावेत असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.