राष्ट्रीय लोकअदालतीने ५ जोडप्यांची दुभंगलेली मने जुळविली.. १ हजार ५८० प्रकरणे निकाली, विशेष कलमांच्या ७२० प्रकरणाचा निपटारा, विविध प्रकरणातून ३ कोटी ७५ लक्ष रुपयांची वसुली…

वाशिम, दि. 20 ऑगस्ट 2022: १३ ऑगष्ट रोजी जिल्हा व सत्र न्यायालय आणि अधिनस्त सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५ जोडप्यांचा विस्कटलेला संसाराचा गाडा पुर्ववत सुरु करण्यात यश प्राप्त झाले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. श्री कलोती यांचे हस्ते संबधीत जोडप्यांना पुष्पगुच्छ देऊन भविष्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हातील विविध न्यायालयांत प्रलंबित असलेले एकुण ६ हजार ९४ (जिल्हा ग्राहक मंचाकडील ४ प्रकरणांसह) प्रकरणे तसेच ३ हजार २३ दाखपुर्व प्रकरणे असे एकुण ९ हजार ११७ प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी न्यायालयात प्रलंबित असलेली १ हजार २२२ प्रकरणे तसेच दाखल पुर्व ३५८ प्रकरणे अशा एकुण १ हजार ५८० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यात एकुण ३ कोटी ७५ लक्ष ३ हजार ३८५ रुपये एवढया रक्कमेची वसुली करण्यात आली.

राष्ट्रीय लोकअदालतीने ५ जोडप्यांची दुभंगलेली मने जुळविली.. १ हजार ५८० प्रकरणे निकाली, विशेष कलमांच्या ७२० प्रकरणाचा निपटारा, विविध प्रकरणातून ३ कोटी ७५ लक्ष रुपयांची वसुली…

उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार ६ ते १२ ऑगष्ट २०२२ दरम्यान जिल्हयातील न्यायालयामध्ये विशेष कलमांतर्गतची प्रकरणे निकाली काढण्याकरीता (स्पेशल ड्राइव्ह) विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये जिल्हा तसेच तालुका न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या एकुण ७२० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायीक अधिकारी, वकील संघाचे सदस्य, जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment