अहमदनगर औरंगाबाद रस्त्यावर अहमदनगरपासून सुमारे ६६ कि. मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदीर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.अहमदनगर औरंगाबाद रस्त्यावर अहमदनगरपासून सुमारे ६६ कि. मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदीर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.

“रेडक्रॉस” ने जपली सामाजिक बांधिलकी : 50 क्षयरुग्णांना घेतले दत्तक | दानशूर व्यक्तींनी क्षयरुग्णांना दत्तक घेण्यासाठी पुढे यावे – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

कोल्हापूर,दि. २७(आजचा साक्षीदार) : इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा, कोल्हापुर यांनी 50 क्षयरुग्णांना दत्तक घेतले. यातील 15 रुग्णांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात पोषण आहार कीटचे वाटप करण्यात आले. “रेडक्रॉस” च्या निर्णयाचे कौतुक करत समाजातील इतर दानशूर लोकांनीही अशा पद्धतीने या अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार, रेडक्रॉस कोल्हापुरचे सचिव सतीशराज जगदाळे, खजानिस महेंद्र परमार, शोभा तावडे, डॉ. विनायक भोई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारताच्या उद्दीष्ट्यपूर्तीसाठी राष्ट्रपतीं यांनी प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत संस्था, उद्योग समुह, व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी आपल्या तालुक्यातील किंवा कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना पोषण आहार देऊन किमान सहा महिन्यांसाठी दत्तक घेवून सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.उषा कुंभार यांनी केले होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2025 पर्यंत क्षयरोगाचे निराकरण करण्याचे धोरण निश्चित केले आहे. ज्या व्यक्तीचा आहार पोषक नाही अशा व्यक्तींमध्ये क्षयरोगाचे प्रमाण अधिक असते. अशा व्यक्तींना उपचार कालावधीत पोषण आहार मिळाला नाही तर त्यांना उपचार मिळूनही त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतातच असे नाही. यामुळे क्षयरुग्णांमध्ये पोषक आहार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे क्षयरुग्णांसाठी फूड बास्केट तयार करण्यात आली आहेत. पोषण आहार घेण्याची अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनी पुढाकार घेऊन पोषण आहारासाठी मदत करावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *