रेशीम दिन साजरा • तुती लागवड नियोजनावर एक दिवसीय कार्यशाळा

भंडारा, दि. 2 : रेशीम संचालनालयाच्या स्थापनेला आज पंचवीस वर्ष पुर्ण होण्याच्या निमित्ताने 1 सप्टेंबर रेशीमदिन रौप्य महोत्सव संपूर्ण राज्यात साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा रेशीम कार्यालयाव्दारे मूलभूत सुविधा केंद्र, जमनी येथे रेशीम दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जमनी येथे रेशीम दिन साजरा • तुती लागवड नियोजनावर एक दिवसीय कार्यशाळा

रेशीम दिनानिमित्त जिल्ह्यातील होतकरू टसर रेशीम शेतकरी तसेच तुती रेशीम शेतकरी यांचा या प्रसंगी गौरव करण्यात आला. नविन शेतकऱ्यांना प्रशिक्षीत करण्याकरीता “तुती लागवड नियोजन व व्यवस्थापन” एक दिवसीय कार्यशाळा यावेळी घेण्यात आली. सध्या देशातर्गंत व देशाबाहेर रेशीम कापडाची प्रचंड मागणी आहे. हा व्यवसाय शेती पुरक असून शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न देणारा आहे.रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे तहसीलदार अरविंद हिंगे, नायब तहसीलदार निंबार्ते, प्रमुख मार्गदर्शक वैज्ञानिक सी, केंद्रीय रेशीम मंडळ डॉ. पी. सी. गेडाम व रेशीम विकास अधिकारी ए.एम. ढोले हे उपस्थित होते. तसेच जिल्हयातील रेशीम लाभार्थी व सिल्क उद्योग उद्योजक रामकृष्ण सोनकुसरे उपस्थित होते.

तहसीलदार अरविंद हिंगे यांनी उपस्थित रेशीम लाभार्थ्यांना रेशीम उद्योगाचे महत्त्व पटवून देताना ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अंतर्गत देण्यात येणारे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच डॉ. गेडाम यांनी टसर रेशीम व तुती रेशीम याबाबतचे लाभार्थींना जमीनीची पोत नैसर्गीकरीत्या कशी सुधारावी याबाबतचे सविस्तर माहिती दिली. ए. एम. ढोले यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे तुती रेशीम बाग व्यवस्थापन, नर्सरी लागवड, तुती रेशीम लागवड पद्धती, बागेला रासायनिक खताच्या मात्रा कोणत्या महिन्यात किती प्रमाणात द्यायला पाहिजेत तसेच. ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत व टसर रेशीम बाबतची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाप्रसंगी जे. बी. सरादे, वरीष्ठ तांत्रीक सहायक, जिल्हा रेशीम कार्यालय, यांनी सुत्र केले .तथा रेशीम संचालनालयाचा उद्दीष्ट व धोरण या बाबत माहिती दिली.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रगतीशील शेतकरी महेंद्र पारधिकर यांनी आपले अनुभव संगितले. रेशीम दिन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता जिल्हा रेशीम कार्यालय येथील केंद्रप्रमुख कु. लोणारे, बी. बी. खेडकर, अश्वीन इंगळे, पी. ए. गुरुमुखी, व्ही.डब्लू. बांते व आर. एम. लोहारे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment