लखनौच्या तरुणीने नोकरी नाकारून एक्झॉटिक शेतीत कमावले 1 कोटी!
आजचा साक्षीदार दि. 31 जानेवारी 2025: लखनौची 28 वर्षीय इकोनॉमिक्स ग्रॅज्युएट अनुष्का जयस्वाल हिला पहिल्यापासूनच गार्डनिंगची आवड होती. सुरुवातीला तीने घराच्या टेरेसवर टोमॅटो लागवडीचा प्रयोग केला. 2017 मध्ये दिल्लीतील हिंदू कॉलेजच्या प्लेसमेंट काळात इतर विद्यार्थी नोकरी मिळण्यासाठी तयारी करत होते, पण अनुष्काने नोकरी स्वीकारण्याऐवजी ग्रामीण लेव्हलवर काम करण्याचा निर्णय घेतला.
तीच्या भावाच्या सल्ल्याने तिने नोएडातील हॉर्टिकल्चर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग घेतले आणि प्रोटेक्टेड फार्मिंगचा अभ्यास केला. 2020 मध्ये तिने लखनौजवळील मोहनलालगंज येथे एका एकरवर पॉलीहाऊस फार्मिंग सुरू केली. सुरुवातीला इंग्लिश काकडीची लागवड करून 51 टन प्रॉडक्शन घेतले, जे ट्रेडिशनल शेतीच्या तुलनेत तिप्पट होते.
लखनौच्या तरुणीने चांगल्या पगाराची नोकरी नाकारुन केली एक्झॉटिक भाज्यांची शेती, मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरुन 6 एकर जागेतून आज वार्षिक टर्नओव्हर आहे 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक
त्यानंतर तिने लाल व पिवळ्या बेल पेपर्सची लागवड केली. एका एकरवर 35 टन प्रॉडक्शन घेतले आणि सरासरी 80-100 रुपये प्रति किलोने विक्री केली. आज ती 6 एकर पॉलीहाऊसमध्ये 210 टन पेक्षा अधिक बेल पेपर्ससह लेट्यूस, बोकचॉय, झुकिनी आणि इतर एक्झॉटिक भाज्या पिकवते. तिचा वार्षिक टर्नओव्हर 1 कोटी रुपयांहून अधिक आहे.

ती Blinkit, Big Basket आणि Lulu Hypermarket यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर भाज्यांची विक्री करते. तिच्या शेतावर 25-30 कामगार कार्यरत आहेत, त्यातील बहुतेक महिला आहेत.
अनुष्काला सुरुवातीला स्ट्रक्चरल इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेनिंगची कमतरता अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर तिने यश मिळवले. आज तिच्या पॉलीहाऊसमध्ये टेम्परेचर व ह्युमिडिटी कंट्रोलसाठी फॅन-पॅड सिस्टम आणि इरिगेशन सिस्टम अशा मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरल्या जातात.
अनुष्का लोकांना पॉलीहाऊस शेतीबद्दल मार्गदर्शन करते आणि महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते. तिचा उद्देश शेतीत महिलांचा सहभाग वाढवणे आणि इकोफ्रेंडली पद्धतींचा प्रचार करणे आहे.