लघु पाटबंधारे तलाव संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करा • मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन

वाशिम, दि. 02 : लघु पाटबंधारे विभागाकडून मत्स्यव्यवसाय विभागास हस्तांतरीत करण्यात आलेल्या नवीन तलावावर संस्था नोंदणी केली जाते. मानोरा तालुक्यातील उमरी येथील लघु पाटबंधारे तलाव 17 हेक्टरसाठी कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, कारंजा (लाड) यांचेकडून मासेमारी हक्कासाठी हस्तांतरीत झालेला आहे. उमरी तलाव परिसरातील स्थानिक लोकांना प्रकल्पग्रस्त मागासवर्गीय व महिलांना संधी मिळण्याच्या दृष्टीने उमरी येथील 17 हेक्टर लघु पाटबंधारे तलावावर संस्था नोंदणी करण्याबाबतचा प्रस्ताव सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), मुर्तीजापूर रोड, अकोला यांच्याकडे सादर करावे. असे आवाहन मत्स्यव्यवसायचे सहाय्यक आयुक्त एम. व्ही. जयस्वाल यांनी केले आहे.

उमरी येथील लघु पाटबंधारे तलाव संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करा • मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment