लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांच्या वाहतुकीला मनाई…

पुणे शहरात दिवसभरात विक्रमी लसीकरण !|Pmcvaccination

लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांच्या वाहतुकीला मनाई…

नांदेड जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांची वाहतुक करू नये अन्यथा दंड आकारण्यात येईल, असे आवाहन सर्व खाजगी व सार्वजनिक प्रवासी वाहन सेवा पुरविणाऱ्या सर्व वाहनचालक-मालकांना प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने कोरोना रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून याबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकारी नांदेड यांनी परिपत्रक निर्गमीत केले आहे. जगात सध्या कोरोनाचा नवीन धोकादायक व्हेरीएंट ओमीक्रोनचे संकट असून त्याच्या वाढत्या प्रभावास तोंड देण्यासाठी 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक / खाजगी वाहनांतून प्रवास करण्यासाठी 18 वर्षावरील सर्व वाहनचालक, मालक व प्रवासी यांनी त्यांचे कोवीड लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक पुरविणाऱ्या वाहन मालकांनी कोवीड अनुरूप वर्तनाचे पालन न केल्यास कसूर करणाऱ्यास व सेवा पुरवठादार यांना 500 रुपये इतका दंड आकारण्यात येईल. बसेसच्याबाबतीत कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी 10 हजार रुपये इतका दंड आकारण्यात येईल.

वारंवार या कर्तव्यात कसूर होत असेल तर कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लॉयसन्स काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन किमान दोन दिवस बंद करण्यात येईल. याची दक्षता सर्व खाजगी तसेच सार्वजनिक प्रवासी वाहन सेवा (ऑटोरिक्षा / टॅक्सी / बस / जीप टाईप वाहने इत्यादी) पुरविणाऱ्या सर्व वाहन चालक, मालक व प्रवासी यांनी घ्यावी, असेही आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment