वंजारी सेवा संघांच्या विदर्भ दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद…डॉ. दराडे यांनी साधला समाज बांधवांशी संवाद…

वंजारी सेवा संघांच्या विदर्भ दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद...डॉ. दराडे यांनी साधला समाज बांधवांशी संवाद...

◆वंजारी सेवा संघांच्या विदर्भ दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद ◆◆◆डॉ दराडे यांनी साधला समाज बांधवांशी संवाद◆◆◆

नाशिक( चंद्रशेखर कापसे उ. महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख) : वंजारी सेवा संघ हा फक्त महाराष्ट्र पर्यंत मर्यादित न राहता एक चतुरस्त्र भूमिकेतून कार्य करणारी देशव्यापी चळवळ बनू पाहत आहे. ओबीसी आरक्षण, युवा वर्गाचे शैक्षणिक प्रश्न, महिला सबलीकरण आणि विशेष करून ग्रामीण महाराष्ट्राच्या महिलांच्या प्रश्नावर वंजारी सेवा संघाच्या महिला राज्याध्यक्ष श्रीमती डॉ मंजुषा दराडे यांनी विदर्भातील वंजारी बांधवांशी “वंजारी जोडो’ अभियान द्वारे संवाद साधत विदर्भ दौऱ्यातून वंजारी बांधवांचे प्रश्न समजून घेतले व सेवा संघाची भूमिका दराडे यांनी स्पष्ट केली अशी माहिती वंजारी सेवा संघाचे माध्यम प्रमुख, उत्तर महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख श्री चंद्रशेखर कापसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे विशद केली आहे.

याबाबत कापसे यांनी सांगितले की डॉ दराडे यांनी नुकताच विदर्भ दौरा करत नागपुर, वर्धा, हिंगणघाट, वाशीम, यवतमाळ असा 5 जिल्ह्यांचा दौरा करून समाज बांधवांना सेवा संघात सहभागी होण्याचे याप्रसंगी आवाहन केले. या दौऱ्याप्रसंगी नाशिक जिल्हा व उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीची पदाधिकारी सह विदर्भातील पाचही जिल्ह्यांचे महिला पदाधिकारी व जिल्हा अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते. “वंजारी जोडो’ या सेवा संघाच्या अभियानाद्वारे डॉ दराडे यांनी सांगितले की, वंजारी सेवा संघ ही संघटना वंजारी बांधवांसाठी गेल्या पंधरा वर्षांपासून अविरत न्याय हक्कासाठी काम करणारी एक अभिनव चळवळ आहे. सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री राहुल जाधवर,राज्य कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे, राज्य उपाध्यक्ष विठ्ठलराव गिते, महिला राज्याध्यक्षा डॉ.मंजुषा दराडे, बाजी दराडे, सुधाकर मुंडे, अमोल कुटे अदि पदाधिकारी संघाचे ध्येय धोरणे राबविण्यात आघाडीवर असतात असे दराडे यांनी सांगितले.

डॉ.दराडे यांनी संघाच्या राज्यातील कामकाजावर प्रकाश टाकताना सांगितले की, सेवा संघ आत्तापर्यंत 40 जिल्ह्यापर्यंत पूर्ण ताकदीने पोचला आहे व ३६ जिल्ह्यात महिला कार्यकारणी चे कामकाज जोरात सुरू झाले आहे त्या पुढे म्हणाल्या की यानंतर तालुक्याच्या संघटन बांधणीवर लक्ष केंद्रित करणार आणि त्यातून खऱ्या अर्थाने वंजारी जोडो अभियान वंजारी बांधवांचे प्रश्न समजून घेण्यात यशस्वी ठरेल यावरच येत्या काळात फोकस टाकण्यात येईल असे दराडे यांनी सांगितले.

वंजारी जोडो या सेवा संघाच्या अभियानात विदर्भातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून दराडे यांचे वंजारी बांधवांनी ठिक ठिकाणी जंगी असे स्वागत केले आहे. वंजारी आरक्षण व ओ बी सी प्रश्नावर संघाने अधिक महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी भूमिका घ्यावी अशा प्रतिक्रिया समाज बांधवांनी दौऱ्या प्रसंगी मांडल्याचे संस्थापक अध्यक्ष श्री राहुल जाधवर व कार्याध्यक्ष श्री देवेंद्र बारगजे यांनी यावेळी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment