वसतिगृह प्रवेशासाठी 5 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत…
भंडारा : सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणारी शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आली आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तरी शालेय शिक्षण व कनिष्ठ महाविद्यालयांच्या 2021-22 च्या रिक्त जागे करीता वसतिगृह प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 डिसेंबर आहे. ज्या विद्यार्थी-विद्यार्थींनींना शासकीय वसतिगृहात प्रवेश घ्यायचा आहे.
त्यांनी शासकीय वस्तीगृहातून अर्ज प्राप्त करुन विहित वेळेत सादर करण्याचे आवाहन सुकेशनी तेलगोटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा, असे समाज कल्याण विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.