0 0
Read Time:4 Minute, 33 Second

विकसित भारत संकल्प यात्रेचे जिल्ह्याचे काम कौतुकास्पद | जिल्ह्यातील 100 टक्के लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ द्या -केंद्रीय सहसचिव अनीता शाह अकेला

कोल्हापूर, दि. 16 : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात घेण्यात येत आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून या सर्व महत्वाकांक्षी योजनांचा लाभ जिल्ह्यातील 100 टक्के लक्षित लाभार्थ्यांना मिळवून द्यावा, अशा सूचना विकसित भारत संकल्प यात्रेच्या केंद्रीय सहसचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रभारी अधिकारी अनीता शाह अकेला यांनी दिल्या.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहुजी सभागृहात श्रीमती शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्ह्यातील संकल्प यात्रेच्या सद्यस्थितीबाबतची माहिती सादरीकरणाव्दारे सर्व योजना प्रमुखांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्ह्याचे नोडल अधिकारी (ग्रामीण) अरुण जाधव, कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त तथा नोडल अधिकारी (शहर) साधना पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह सर्व महत्वाकांक्षी योजनांचे प्रमुख उपस्थित होते.

विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान कोल्हापूर जिल्ह्याचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण झाल्याबद्दल जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व या सर्व योजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक करुन श्रीमती शाह म्हणाल्या, या संकल्प यात्रेच्या माध्यमातून आतापर्यंत लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील उर्वरित लाभार्थ्यांपर्यंतही शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा.

विकसित भारत संकल्प यात्रेचे जिल्ह्याचे काम कौतुकास्पद | जिल्ह्यातील 100 टक्के लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ द्या -केंद्रीय सहसचिव अनीता शाह अकेला

विकसित भारत संकल्प यात्रेमधील सर्व महत्वाकांक्षी योजनांचा लाभ लवकरात लवकर जिल्ह्यातील 100 टक्के लाभार्थ्यांना मिळवून देण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.

यावेळी प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत कार्ड, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, अटल पेंशन योजना, स्वामित्व योजना, हर घर जल आदी विविध योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा श्रीमती शाह यांनी यावेळी घेतला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *