शासकीय तंत्रनिकेतनच्या मुलींच्या वसतीगृह रिक्त जागेकरीता प्रवेश सुरु

शासकीय तंत्रनिकेतनच्या मुलींच्या वसतीगृह रिक्त जागेकरीता प्रवेश सुरु

वाशिम, दि. २३ जानेवारी (आजचा साक्षीदार) : अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींसाठी शहरातील सिव्हील लाईन भागत असलेल्या वसतीगृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थीनीचे अर्ज महाविद्यालया मार्फत मागविण्यात येत आहे.

या वसतीगृहामध्ये 70 टक्के जागा अल्पसंख्यांक समाजातील मुलींसाठी राखीव असतील. उर्वरित 30 टक्के जागा बिगर अल्पसंख्यांक मुलींसाठी असतील. 70 टक्के जागेच्या प्रवेशाकरीता अर्ज प्राप्त न झाल्यास किंवा जागा शिल्लक राहिल्यास या जागा बिगर अल्पसंख्यांक मुलींमधून भरण्यात येतील. वसतीगृहात मागील शैक्षणिक सत्रात राहत असलेल्या विद्यार्थीनींना नियमानुसार प्राधान्य येण्यात येईल. वसतीगृह प्रवेश हा विद्यार्थीनीच्या इ. 12 वी तील गुणांच्या टक्केवारीवर देण्यात येईल.

वसतीगृहात प्रवेशासाठी विद्यार्थीनींकडून प्रत्येक सत्रासाठी 2850 रुपये शुल्क आकारले जाईल. परंतू अल्पसंख्यांक कुटूंबाचे वार्षिक उत्पन्‍न मर्यादा 8 लक्ष रुपयापेक्षा कमी असल्यास त्यांना शुल्क माफ करण्यात येईल. विद्यार्थीनींनी महाविद्यालयाच्या प्राचार्यामार्फत अर्ज व आवश्यक कागदपत्रे 21 जानेवारीपर्यंत सादर करावे. प्रवेश प्रक्रीया 24 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पासून राबविण्यात येईल. त्यासाठी सर्व विद्यार्थीनींनी व पालक वर्गाने वसतीगृहात उपस्थित राहावे. असे आवाहन प्राचार्य, शासकीय तंत्र निकेतन, वाशिम यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment