शिक्षक मतदारसंघ निवडणूक मद्यविक्री अनुज्ञप्ती बंदचे आदेश जारी

सर्व शासकीय यंत्रणांनी पंचमहाभूत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परांत समन्वय ठेवावा -प्रधान सचिव प्रवीण दराडे

शिक्षक मतदारसंघ निवडणूक मद्यविक्री अनुज्ञप्ती बंदचे आदेश जारी

जालना,दि. २७(आजचा साक्षीदार) : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 चा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे. दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कालावधीत शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधीत ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135-सी तसेच मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142(1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जालना जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी जारी केले आहेत.

आदेशात नमूद केल्याप्रमाणे जालना जिल्हयात मतदान संपण्यापुर्वीच्या 48 तास अगोदरपासून पूर्णवेळ म्हणजेच दि.28 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून पुढे तसेच मतदानाच्या पुर्वीचा संपूर्ण दिवस दि.29 जानेवारी रोजी व मतदानाच्या दिवशी दि. 30 जानेवारी रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात याव्यात.

मतमोजणी ही दि.2 फेब्रुवारी 2023 रोजी औरंगाबाद येथे होणार असल्याने या दिवशी कोरडा दिवस ठेवण्याची आवश्यकता नाही. या आदेशाचे पालन संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी करावे. आदेश उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द नियमानूसार कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमुद केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment