शेतकरी उत्पादक प्रकल्पांना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली भेट

नंदुरबार, दि. 3 : नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामसमुहातील वडसत्रा, सागाळी, भादवड येथील डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारच्या सहयोगाने सुरु असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रकल्पांना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी भेट दिली.

शेतकरी उत्पादक प्रकल्पांना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली भेट

यावेळी त्यांच्यासमवेत तहसिलदार मंदार कुलकर्णी, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. राजेंद्र दहातोंडे, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक प्रमोद पाटील, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील आदी उपस्थित होते.

शेतकरी उत्पादक प्रकल्पांना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली भेट

जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी जागतिक बॅक अर्थसहाय्यीत याहा आदिवासी नवापूर फार्मस प्रोड्युसर कंपनी, वडसत्रा, नेसू परिसर शेतकरी उत्पादक कंपनी लि., सागाळी, शिवम डेअरी फॉर्म, भादवड पशुखाद्य निर्मिती उद्योग,भात गिरणी, तेलघाणा प्रकल्प अशा शेतकरी उत्पादक कंपन्यांना भेट देवून प्रकल्प चालवितांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

शेतकरी उत्पादक प्रकल्पांना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली भेट

श्रीमती खत्री म्हणाल्या की, जिल्ह्यात सुरु असलेले नाविण्यपूर्ण प्रकल्प हे शेतकऱ्यासाठी पथदर्शी असून असे प्रकल्प जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. त्यासाठी सबंधित विभागांने त्यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाविषयींची व योजनांची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्या साठी प्रयत्न करावे. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अशा विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शेतकरी उत्पादक प्रकल्पांना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली भेट

यावेळी प्रकल्पांच्या संचालकांनी सुरु असलेल्या भात गिरणी, भात पीक उत्पादनवाढीसाठी सुरु असलेले प्रयत्न, रेशीम शेतीतील नाविण्यपूर्ण प्रयोग व तयार झालेले रेशीमकोश उत्पादन, सुधारीत चारा लागवड तंत्रज्ञान, दुग्ध व्यवसाय, मुक्त संचार गोठा, देशी गोपालन, गांडूळ खत निर्मिती प्रकल्पांविषयी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. यावेळी कंपनीचे संचालक सत्यानंद गावीत, गुलाबसिंग वसावे, कृष्णा गावीत, देवीदास पाडवी, ईश्वर गावीत, विष्णू वसावे, बबन कोकणी, दिलीप कोकणी, सतीश वसावे, हरीश चौधरी, प्रगतशील शेतकरी राजेंद्र वसावे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. अशोक वळवी, डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. हेडगेवार सेवा समितीचे डॉ. महेश गणापुरे, अनिल पाटील, संदीप खेडकर, प्रदीप हिरे, ललीत अहिरे, तुकाराम धनगर, संदीप कोकणी यांच्यासह शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, भागधारक व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी उत्पादक प्रकल्पांना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली भेट

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment