शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपये कर्ज, योजनेचा लाभ ‘असा’ घ्या.. | PM Kisan FPO Yojana Online Apply

शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपये कर्ज, योजनेचा लाभ ‘असा’ घ्या.. | PM Kisan FPO Yojana Online Apply

👨🏻‍🌾 शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपये कर्ज, योजनेचा लाभ ‘असा’ घ्या..


💁🏻‍♂️ देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही शेतकरी योजनांचा लाभ घेत असाल तर एक योजना केंद्र सरकारची आहे, जी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देऊन करते. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या अंगावर असणारा कर्जाचा बोजा कमी करण्याच्या हेतूने काही योजना आणून प्रयत्न करत आहे.

🌽 आता केंद्र सरकार अशा शेतकऱ्यांना कर्ज देणार आहे, ज्या शेतकऱ्यांना शेती करण्याशिवाय शेतीच्या संबंधित इतर व्यवसाय करायचा आहे. अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकार 15 लाख रुपये कर्ज देत आहे. यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना नवीन शेती संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी ‘पीएम किसान एफपीओ योजना’ योजना सुरू केली आहे.

💰 योजनेचा लाभ:

▪️ केंद्र सरकारने ‘पीएम किसान एफपीओ योजना’ या अंतर्गत ‘फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन’ला 15 लाख रुपये दिले जातील.
▪️ पीएम किसान एफपीओ योजनेचा लाभ हा 11 शेतकऱ्यांनी मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन केल्यास मिळणार आहे.
▪️ या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे किंवा खते, बी-बियाणे किंवा औषधे खरेदी करता येणे खूपच सोपे होणार आहे.

📝 अर्ज कसा करायचा..?

▪️राष्ट्रीय कृषी बाजाराच्या (नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट) अधिकृत वेबसाईटवर जा. (https://enam.gov.in/web/)

▪️ होम पेजवर आल्यानंतर मेन्यूमध्ये जाऊन एफपीओ पर्यायावर क्लिक करा .

▪️ आता रजिस्ट्रेशन (नोंदणी) किंवा लॉग इन असे पर्याय दिसतील. तिथे रजिस्ट्रेशन (नोंदणी) या पर्यायावर क्लिक करा.

▪️ समोर आलेला नोंदणी फॉर्म भरा किंवा काही तांत्रिक समस्या आल्यास 18002700224 या नंबरवर कॉल करा.


▪️ आता फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरा. (आयडी, बँक तपशील व इतर माहीती)


▪️ सर्व झाल्यानंतर आता सबमिट बटनावर क्लिक करा.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment