शेतकऱ्यांनी केबल ॲण्ड पोस्ट शेडनेटगृहासाठी महाडिबीटी पोर्टलवर मागणी नोंद करावी…
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 अंतर्गत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर हरितगृह व शेडनेट गृहाचा लाभ दिला जातो. त्यासाठी महाडीबीटी या आपले सरकार पोर्टलवरील mahadbtmahait.gov.in या लिंकव्दारे लाभार्थ्यांनी मागणी करावयाची आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी केबल ॲण्ड पोस्ट प्रकारच्या शेडनेटगृहाचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर मागणी नोंद करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे. याअंतर्गत नव्याने केबल ॲण्ड पोस्ट प्रकारचे शेडनेटगृहाचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे.