शेतकऱ्यांनी गरजेनुसार युरिया खताचा वापर करावा – जिल्हा परिषद कृषि विभाग

शेतकऱ्यांनी गरजेनुसार युरिया खताचा वापर करावा - जिल्हा परिषद कृषि विभाग

शेतकऱ्यांनी गरजेनुसार युरिया खताचा वापर करावा – जिल्हा परिषद कृषि विभाग

नांदेड दि. ११ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) – जिल्ह्यास जानेवारी महिण्यात युरिया खताची मागणी वाढत आहे. जिल्ह्यात 15 हजार मे. टन युरिया खताचे पुरवठा नियोजन प्राप्त झाले आहे. त्यानुसार आजच्या स्थितीला आयपीएल कंपनीचे 1800 मे. टन व नागार्जूना कंपनीच्या 2200 मे. टनच्या रॅक प्राप्त झाल्या आहेत. त्या दोन दिवसांत जिल्ह्यात वितरीत होतील. शेतकऱ्यांनी पिकाच्या गरजेनुसार व कृषि विद्यापीठ शिफारस मात्रेनुसारच युरिया खताचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

(महाराष्ट्र शासन उपक्रम । महाराष्ट्र शासन योजना । सरकारी योजना )

आपल्या जिल्ह्यास युरिया खत आवश्यकतेनुसार उपलब्ध होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी दाळवर्गीय हरभरा पिकास युरिया खताचा वापर टाळावा जेणे करुन पिकाची अनावश्यक वाढ होणार नाही व खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होईल. अमोनियम सल्फेट ज्यामध्ये नत्र 20.6 सल्फर 23 टक्के असणाऱ्या खताचा युरिया खतास पर्याय म्हणून वापर केल्यास पिकास हळूहळू अमोनियम सल्फेट मधील नत्र उपलब्ध होईल. पिकास सल्फरची कमतरता भासणार नाही. तसेच जिल्ह्यात नॅनो युरिया उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी युरिया खताचा पर्याय म्हणून नॅनो युरिया खताचा वापर केल्यास युरिया खतामुळे कमी होणारी जमीनीची पोत टाळता येईल व पिकांना त्वरीत वेळेवर नत्र उपलब्ध होईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment