शेतमालावर वखार महामंडळातर्फे “अभिनव ऑनलाईन शेतमाल तारण कर्ज” योजनेअंतर्गत मिळणार तारण कर्ज || Abhinav Online Shetmal Taran Karj Yojna 

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातर्फे “अभिनव ऑनलाईन शेतमाल तारण कर्ज” योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यां साठी घोषित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी बांधवांसाठी वखार पावतीवरील शेतमालावर ऑनलाईन तारण कर्ज देण्याबाबत “अभिनव ऑनलाईन शेतमाल तारण कर्ज” हि योजना आहे

वखार पावतीवर “अभिनव ऑनलाईन शेतमाल तारण कर्ज” योजनेतून मिळणार कर्ज…Abhinav Online Shetmal Taran Karj Yojna 

शेतकऱ्यास वखार पावतीवर कर्ज धेण्यासाठी कोणत्याही बँकेत किंवा पतसंस्थेत न जाता वखार महामंडळाच्या गोदामातच ऑनलाईन तारण कर्ज मिळणार आहे, शेतकऱ्याला मिळालेली कर्ज रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

“अभिनव ऑनलाईन शेतमाल तारण कर्ज” योजनेची ठळक वैशिष्ट्ये Charecteristics of Abhinav Online Shetmal Taran Karj Yojna 

  • साठविलेल्या शेतमालाच्या किंमतीच्या 70 % पर्यंत राज्य सहकारी बँक कर्ज देणार.
  • तारण कर्जाचा व्याजदर 9 % प्रती वर्ष.
  • तारण कर्जासाठी लागणारी कागदपत्रे वखार केंद्र, कार्यालयात जमा करून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुर्ण करून ताबडतोब कर्ज रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार.
  • पिकपेरा प्रमाणपत्राच्या आधारे वखार महामंडळातर्फे वखार भाड्यात 50 % सवलत.
  • शेतमालाची वखारीत शास्त्रशुध्द पध्दतीने साठवणुक तसेच विमा संरक्षण.

“अभिनव ऑनलाईन शेतमाल तारण कर्ज” योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी || Documents for Abhinav Online Shetmal Taran Karj Yojna 

  • आधारकार्ड
  • पॅन कार्ड (उपलब्ध असल्यास)
  • ठेवीदाराचा 7/12 उतारा
  • बँक वचन चिठ्ठी
  • सभासदत्व अर्ज

“अभिनव ऑनलाईन शेतमाल तारण कर्ज” योजनेच्या अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी संपर्क करा Contacts for Abhinav online Shetmal Taran Karj Yojana

    

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ

    फोन नंबर : 020-24206800

    संकेतस्थळ  : www.mswarehousing.com

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि.

फोन नंबर : 022-2280-0553

जास्तीतजास्त शेतकरी बांधवानी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या “अभिनव ऑनलाईन शेतमाल तारण कर्ज” या योजनेचा लाभ घेवा.

शेतमालावर वखार महामंडळातर्फे "अभिनव ऑनलाईन शेतमाल तारण कर्ज" योजनेअंतर्गत मिळणार तारण कर्ज || Abhinav Online Shetmal Taran Karj Yojna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *