0 0
Read Time:8 Minute, 43 Second

UAE चा भीमपराक्रम :  संयुक्तअरब अमिरातीच्या ‘अल अमल’ (Al – Amal) यानाची मंगळाकडे झेप..ठरला मंगळावर यान पाठवणारा पहिला मुस्लीम देश || UAE Hope Mars Mission

संयुक्त अरब अमिरात (युएई) ने मंगळ मोहिमेचे जपानच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. युएईने ‘होप मार्स मिशन’ (Hope Mars Mission)  अंतर्गत मंगळाचा अभ्यास कराण्यासाठी पाठवण्यात आलेल्या यानाचे जपानमधील तानेगाशिमा येथील लाँच पॅडवरुन यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं त्यामुळेच मंगळावर यान सोडणारा युएई हा पहिला मुस्लीम देश असण्याचा मन मिळवला आहे. संयुक्त अरब अमिरात (युएई) च्या अंतराळ संशोधन संस्थेनेच हे प्रक्षेपण यशस्वी ठरल्याची माहिती दिल्याचे एएनआयने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनी यान प्रक्षेपीत करण्यात आलं. पुढील सात महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यात हे यान मंगळाच्या दिशेने प्रवास करेल. त्यानंतर २०२१ मध्ये फ्रेब्रुवारी महिन्यामध्ये हे यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करुन तेथील हवामान आणि वातावरणातील बदलांसंदर्भात अभ्यास करणार आहे. हे यान म्हणजे उमेद आणि मानवतेचे प्रतिक असल्याचे युएईने म्हटलं आहे. १.३ टन वजनाचे हे यान ५० कोटी किमीचे अंतर पार करणार आहे.

काय आहे हे ‘होप मार्स मिशन’ (Hope Mars Mission) ?

‘होप मार्स मिशन’ (Hope Mars Mission) च्या माध्यमातून मंगळाच्या वातारवणाचा अभ्यास करण्यात येणार आहे. मुख्य बाबा म्हणजे या मोहिमेच्या माध्यमातून पहिल्यांदाच एक हवामानासंदर्भात अभ्यास करणारा उपग्रह मंगळावर पाठवण्यात आला आहे. या मिशन च्या माध्यमातून मंगळावरील हवा, पाण्याचा अंश आणि मातीचाही या उपग्रहामार्फत अभ्यास केला जाणार आहे. तसेच मंगळाच्या वातावरणामधून हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अस्तित्व कसं संपुष्टात आलं यासंदर्भातील महत्वाची माहिती मिळणार आहे. मंगळ ग्रहासंदर्भातील बरीच नवीन माहिती या उपग्रहाच्या मदतीने मिळणार असून मागील लाखो वर्षांमध्ये मंगळाच्या रचनेमध्ये कसा बदल झाला आहे याचाही अभ्यास या माहितीच्या आधारे करता येणार आहे.

‘होप मार्स मिशन’ (Hope Mars Mission)  यामधून काय माहिती मिळणार?

‘होप मार्स मिशन’ (Hope Mars Mission) च्या माध्यमातून एक हजार जीबीहून अधिक नवीन माहिती मिळणार असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. मिळणारी ही माहिती जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या २०० हून अधिक वैज्ञानिकांना अभ्यासासाठी मोफत देण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मंगळाचा भूतकाळ आणि भविष्यकाळाचा याचा अंदाज मिळालेल्या माहितीच्या आधारे लावता येणार आहे. या माध्यमातून पृथ्वीचे भविष्य काय असेल आणि मंगळावर मानवाला राहता येईल का यासंदर्भातील प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी महत्वाची माहिती या मोहिमेतून मिळणार आहे. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर पाण्याचा अंश सापडल्याचे दावे करण्यात आल्यानंतर मंगळ ग्रहाच्या वातावरणामध्येही पाण्याचा अंश आहे का आणि असला तरी कशाप्रकारची जीवसृष्टी आधी मंगळ ग्रहावर अस्तित्वात होती किंवा भविष्यात कशाप्रकारे ती अतित्वात येऊ शकते याचा अभ्यास ‘होप मार्स मिशन’ च्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

युएईचा ‘होप मार्स मिशन’ (Hope Mars Mission)  हेतू काय?

‘होप मार्स मिशन’ (Hope Mars Mission)  मार्फत मंगळ ग्रह संदर्भात मानवाला अधिक माहिती कळावी आणि या ‘होप मार्स मिशन’ मोहिमेमधून मिळालेली माहिती सर्वांना उपलब्ध करुन देत संशोधनासंदर्भात जगभरातील देशांमध्ये परस्पर सहाकार्याचे वातावरण तयार करण्याचा युएईचा विचार आहे. तसेच अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये संयुक्त अरब अमिरात (युएई) ही मोहीम पाठवण्यासाठी सक्षम असल्याचे ‘होप मार्स मिशन’ च्या माध्यमातून दाखवून द्यायचे आहे. संयुक्त अरब अमिरात (युएई) मधील येणाऱ्या पिढ्यांनाही अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये भरीव काम करण्याच्या संधी उपलब्ध असल्याचे होपच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा संयुक्त अरब अमिरात (युएई) चा विचार आहे.

संयुक्तअरब अमिरातीच्या ‘अल अमल’ (Al Amal) यानाची मंगळाकडे झेप

संयुक्त अरब अमिराती (युएई) चे अवकाशयान सोमवारी मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले. ‘अल अमल’ (Al Amal) असे या अवकाशयानाचे नाव असून त्याचा अर्थ अर्थ ‘आशा’ असा होतो. ‘अल अमल’ जपानच्या प्रक्षेपण तळावरून सोडण्यात आले आहे तसेच अरब जगतातील कुठल्याही देशाने आतापर्यंत अशी आंतरग्रहीय मोहीम राबवली नव्हती.
संयुक्त अरब अमिराती (युएई) चे डिजिटल अर्थव्यवस्था मंत्री ओमर सुलतान अल ओलामा यांनी सांगितले की, या प्रकल्पात कोविड १९ चा मोठा अडथळा येत होता पण त्यावर मात करण्यात यश आले आहे. सर्व ‘होप मार्स मिशन’ संभंधित सामग्री जपानमध्ये प्रक्षेपणापूर्वी पाठवणे गरजेचे होते. ‘होप मार्स मिशन’  हा २०० दशलक्ष डॉलर्सचा हा प्रकल्प असून अरब जगतातील आंतरग्रहीय योजना पहिल्यांदाच यशस्वी झाली आहे. या मोहिमेसाठी अमिरातीच्या १३५ अभियंत्यांनी सहा वर्षे परिश्रम केले होते. हे अवकाशयान फेब्रुवारी २०२१ मध्ये मंगळावर पोहोचणार असून त्यावेळी अमिरातीच्या स्थापनेचा पन्नासावा वर्धापन दिन आहे.
दी गल्फ न्यूज ने दिलेल्या माहितीनुसार हे ‘अल अमल’ (Al Amal) हे अवकाशयान २०० दिवसांनी मंगळाच्या कक्षेत पोहोचणार असून तेथील वातावरणाचा अभ्यास करणार आहे. मंत्री ओलामा यांनी देशाच्या अभियंत्यांनी अहोरात्र काम करून यान विकसित केल्याबद्दल त्यांचे भरमसाठ कौतुक केले आहे. आता अमेरिका व चीन या दोन देशांच्या मंगळ मोहिमा पाठोपाठ होणार असून आमचेच यान मंगळावर आधी पोहोचेल असे संयुक्त अरब अमिरातीच्या अवकाश संस्थेचे अध्यक्ष अहमद बेलहोल अल फलासी यांनी म्हटले आहे.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *