“सद्भावना दिवस” व “सामाजिक ऐक्य पंधरवडा” साजरा करण्याच्या जिल्हा प्रशासनाकडून सूचना …

नांदेड दि. 20 ऑगस्ट 2022 :- माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा जयंती दिवस 20 ऑगस्ट हा दरवर्षी “सद्भावना दिवस” म्हणून साजरा केला जातो. याअनुषंगाने “सामाजिक ऐक्य पंधरवडा” हा 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2022 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्माच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्द भाव वृद्धींगत करुन हिंसाचार टाळण्यासाठी हा पंधरवडा साजरा केला जातो.

“सद्भावना दिवस” व “सामाजिक ऐक्य पंधरवडा” साजरा करण्याच्या जिल्हा प्रशासनाकडून सूचना …

“सद्भावना दिवस” व “सामाजिक ऐक्य पंधरवडा” साजरा करण्याचे जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी अल्पसंख्यांक विकास विभागाच्या 17 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमीत केलेल्या शासन परिपत्रकातील सूचनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करावे. कार्यक्रम साजरा करुन कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment