0 0
Read Time:7 Minute, 18 Second

सात भारतीय कंपन्यांमध्ये करोनावर लस बनवण्याची स्पर्धा … भारतातील भारत बायोटेक करोना लसीच्या मानवी चाचणीला सुरूवात

(COVID-19 vaccine | Bharat Biotech starts human trial )

देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आणि ही खूप काळजीची बाब आहे. त्यामुळे सर्व भारतीयांच्या तसेच जगातील सर्वांच्याच नजरा ह्या कोविड-१९ आजाराला प्रतिबंध करणारी लस कधी तयार होते याकडे लागल्या आहेत. जगभरात एक कोटीपेक्षा जास्त लोकांना बाधा झालेल्या करोना व्हायरस विरोधात भारतातील सात कंपन्या लस विकसित करत आहेत. यामध्ये भारत बायोटेक, सिरम इन्स्टिटय़ूट, झायडस कॅडीला, पॅनाशिया बायोटेक, इंडियन इम्युनॉलॉजिकल्स, मिनवॅक्स, बायोलॉजिकल इ या सात स्वदेशी कंपन्या करोना व्हायरसवर प्रतिबंदक लस विकसित करत आहेत. 

भारतातील भारत बायोटेक करोना लसीच्या मानवी चाचणीला सुरूवात

(COVID-19 vaccine | Bharat Biotech starts human trial )

दरम्यान, भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी COVAXIN ही करोना विषाणूवरील लस आम्ही तयार करत असल्याचे जाहीर केले होते. भारत बायोटेकने हैदराबादमध्ये विकसित केलेल्या कोव्हॅक्सीन च्या मानवी चाचणीला आजपासून सुरुवात झाली. भारत बायोटेकला फेज १ आणि २ अश्याप्रकारे चाचणीला परवानगी देण्यात आली आहे.
दिल्लीतील एआयआयएसएस ( इंडियन काउंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) सोबत मिळून फार्मा कंपनी या लशीची मानवी चाचणी घेणार आहे. दोन टप्प्यात ही चाचणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात ३७५ जणांवर या लशीचा प्रयोग केला जाणार आहे. यापैकी १०० जण एआयआयएसएसमधील असतील. सदरील लसीची चाचणी ही वय १८ ते ५५ वयोगटातील व्यक्तीवर ही केली जाणार आहे. चाचणीसाठी तयार झालेल्या उमेदवारांना या लसीचा पहिला डोस देण्यात येईल आणि  त्यानंतर १४ दिवसांनी पुढचा डोस देण्यात येणार आहे. लसीच्या परिणामांबाबत निश्चित केलेला कालावधी संपल्यानंतर ज्यांच्यावर चाचणी केली त्या स्वयंसेवकांना तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. कोवॅक्सिनच्या वैद्यकीय चाचणीसाठी आयसीएमआरने देशभरात निवडलेल्या १२ ठिकाणांपैकी दिल्लीतील एआयआयएसएस हे एक ठिकाण आहे.
हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटी मध्येही करोनावरील आजारासाठी लस विकसित करण्यात आली आहे. करोनावरील आजारासाठी तयार करण्यात आलेली पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस COVAXIN ही चर्चेनुसार १५ ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतर फार्मा कंपनी च्या कोरोना लसीबाबत थोडक्यात : 

सिरम (Serum Institute) ऑगस्ट २०२० मध्ये भारतात ऑक्सफर्डच्या लसीची मानवी चाचणी सुरु करणार आहे. सिरम फक्त ऑक्सफर्डच नव्हे तर अमेरिका स्थित कोडॅगनिक्स या कंपनीसोबत मिळूनही लस विकसित करत आहे. ही लस आता प्री-क्लिनिकल ट्रायलच्या स्टेजवर आहे. लस उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या सिरम इन्स्टिटयूटला वर्षअखेरपर्यंत लस विकसित करु, अशी अपेक्षा आहे. सध्या सिरम अ‍ॅस्ट्रॉझेन्का ऑक्सफर्ड लशीवर काम करत आहे. ही लस चाचणीच्या तिसऱ्या फेजमध्ये आहे.

झायडस (Zydus) च्या झायकोव्ह डी लशीच्या चाचण्या पूर्ण होण्यास सात महिने लागणार आहेत. त्यांनी मागच्या आठवडयातच मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत.

पॅनाशिया बायोटेक (Panacea Biotec) कंपनीने आर्यलडच्या रेफाना कंपनीशी भागीदारी केली असून ५० कोटी डोस तयार करण्याचा इरादा आहे. त्यातील ४ कोटी डोस पुढील वर्षी तयार होतील.

इंडियन इम्युनॉलॉजिक्स (Indian Immunologicals) ही राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची कंपनी असून त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफीथ विद्यापीठाशी करार केला आहे.

मिनवॅक्सने (Minvax) पुढच्या दीड वर्षात लस विकसित करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. ही लस प्री क्लिनिकल ट्रायलच्या स्टेजवर आहे. मिनवॅक्सने बीआयआरएसीकडे १५ कोटी रुपयाचे अनुदान मागितले आहे.
बायॉलॉजिकल इ (Biological E) या कंपनीने बनवलेली लसही प्री क्लिनिकल ट्रायलच्या स्टेजवर आहे.
ऑक्सफर्ड (Oxford) आणि अमेरिकेच्या मॉर्डना (Moderna) कंपनीची लस बाजारात लवकर उपलब्ध होऊ शकते तसेच  रशियाची लस पहिल्या स्टेजमध्ये यशस्वी ठरली आहे.

लस निर्मितीच्या टप्प्यांविषयी :

कुठल्याही लसीची चाचणी करुन तिचे उत्पादन करायला अनेक वर्ष लागतात. पण सध्याची गंभीर स्थिती आणि  कोरोना चा वाढत प्रभाव लक्षात घेता कंपन्यांनी काही महिन्यांमध्ये लस विकसित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. लस चाचणी एकूण चार टप्प्यांवर होते. प्री क्लिनिकल टप्प्यामध्ये आधी प्राण्यांवर, त्यानंतर क्लिनिकल टप्प्यामध्ये लस जाते. क्लिनिकल स्टेच्या पहिल्या टप्प्यावर आधी छोटया गटावर लसीची सुरक्षितता तपासली जाते. त्यानंतर आणखी थोडया मोठया गटावर आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये लसीची नेमकी परिणामकारकता तपासणीसाठी हजारो जणांवर चाचणी केली जाते.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *