साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे आवाहन | उद्योग/व्यवसाय करण्यासाठी कर्जाचे अर्ज स्वीकृतीचा कार्यक्रम जाहीर
जालना, दि. 10 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा मार्फत यापुर्वी कोणत्याही प्रकारचा लाभ न घेतलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील वैयक्तीक अर्जदारांना उद्योग/व्यवसाय करण्यासाठी प्राप्त उद्दीष्टानुसार विविध बँकांमार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याकरीता कर्जाचे अर्ज स्वीकृतीचा कार्यक्रम दि. 11 मे 2023 ते दि. 9 जुन 2023 दरम्यान (सुट्टीचे दिवस वगळुन) वेळ सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00 वाजता संबंधित महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळ मजला, जिल्हाधिकारी कार्यालय समोर जालना येथे घेण्यात येणार आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जालना सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता प्राप्त उद्दीष्टे अनुदान योजनेसाठी 100 तर बिज भांडवल योजनेसाठी 50 चे उद्दिष्ट आहे.
अर्जदारा व्यतिरिक्त इतर त्रयस्थ व्यक्तीकडुन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज स्वीकृतीच्या वेळेस अर्जदाराने सर्व मुळ कागदपत्र संबंधित महामंडळास पाहणीसाठी सोबत आणण्याचे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा लाभार्थी निवड समिती व सदस्य सचिव तथा जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ विकास महामंडळ (मर्या) जालना यांनी केले प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.