
नवी दिल्ली : सीमा रस्ते संघटनेत विविध पदांच्या 246 जागांची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. दरम्यान कोणती पदे भरली जाणार? त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल? अर्ज करण्याची मुदत काय असेल? पाहूयात.
ड्राफ्ट्समन पदाच्या 14 जागा भरण्यात येतील. यासाठी शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण आणि आर्किटेक्चरमध्ये किंवा ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)+01 वर्षे अनुभव अशी देण्यात आली आहे.
सुपरवाइजर (एडमिन) पदाच्या 07 जागा भरण्यात येतील. यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर आणि राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्करातील किंवा नौदल किंवा हवाई दलातील माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य) अशी देण्यात आली आहे.
सुपरवाइजर स्टोअर पदाच्या 13 जागा भरण्यात येतील. यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर आणि मटेरियल मॅनेजमेंट/स्टोअर्स कीपिंग/इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र किंवा समतुल्य अशी देण्यात आली आहे.
सुपरवाइजर सायफर पदाच्या 09 जागा भरण्यात येतील. यासाठी शैक्षणिक पात्रता विज्ञान पदवी किंवा ऑपरेटर सायफरसाठी क्लास अभ्यासक्रम उत्तीर्ण अशी देण्यात आली आहे.
हिंदी टायपिस्ट पदाच्या 10 जागा भरण्यात येतील. यासाठी शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण आणि संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. अशी देण्यात आली आहे.
ऑपरेटर (कम्युनिकेशन) पदाच्या 35 जागा भरण्यात येतील. यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आणि ITI (वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य अशी देण्यात आली आहे.
इलेक्ट्रिशियन पदाच्या 30 जागा भरण्यात येतील. यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आणि ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन) किंवा समतुल्य अशी देण्यात आली आहे.
वेल्डर पदाच्या 24 जागा भरण्यात येतील. यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आणि ITI (वेल्डर-G & E) किंवा समतुल्य अशी देण्यात आली आहे.
मल्टी स्किल्ड वर्कर (ब्लॅक स्मिथ) पदाच्या 22 जागा भरण्यात येतील. यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आणि ITI (ब्लॅक स्मिथ किंवा फोर्ज टेक्नोलॉजी किंवा हीट ट्रांसफर टेक्नोलॉजी किंवा शीट मेटल वर्कर) अशी देण्यात आली आहे.
मल्टी स्किल्ड वर्कर (कुक) पदाच्या 82 जागा भरण्यात येतील. यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण अशी देण्यात आली आहे.
उमेदवारांना नोकरी ठिकाण संपूर्ण भारत देण्यात आले आहे. तर खुला/ओबीसी/ईडब्लू/माजी सैनिकांसाठी 50 रूपये फी असेल तर एससी/एसटी प्रवर्गाकडून फी आकारण्यात येणार आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता कमांडंट, जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे-411015 असा आहे. अर्ज पोहचण्याची मुदत 26 सप्टेंबर 2022 पर्यंत देण्यात आली आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://www.bro.gov.in/ पाहा.