0 0
Read Time:12 Minute, 25 Second

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू केस अपडेट्स || Sushant Sing Rajput Case Updates


सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या केस मध्ये रोज नवीन नवीन ट्विस्ट येत आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतला जाऊन आता दिड महिन्यांहून अधिकचा काळ लोटला गेला आहे. सुशांतसिंह राजपूत च्या वडिलांनी के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात मंगळवारी पाटणा येथे एफआयआर दाखल केली यात स्पष्ट शब्दात सिंह यांनी सुशांतला आत्महत्येसाठी उकसवण्याचा आरोप रिया चक्रवर्ती विरोधात केला आहे. रिपोर्टनुसार, मुंबई पोलिसांनी सुशांतच्या कुटुंबियातील सर्वांचे जबाब नोंदवून घेतले होते. यावेळी कोणीही रिया चक्रवर्ती चं नाव घेतलं नव्हतं 

रिया चक्रवर्ती आयुष्यात आल्यानंतरच सुशांत डिप्रेशनमध्ये गेला; FIR  मध्ये गंभीर आरोप : 

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी केवळ रिया चक्रवर्ती वरच नाही तर तिच्या कुटुंबियांवर देखील गंभीर आरोप केलेत. पाटण्यात रिया आणि कुटुंबियाच्या विरोधत एफआयआर देखील केली आहे. यात रियाचे वडिल इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्‍या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांनी सुशांत सिंह राजपूतसोबत जवळीक वाढवली. त्यांच्या  प्रत्येक खासगी गोष्टींत रियाचे कुटुंबिय देखील हस्तक्षेत करत होते.इतकंच नव्हे तर त्याला त्याचं राहतं घर सोडण्यास रिया आणि तिच्या कुटुंबियांनी सांगितलं होतं. सुशांत राहत असलेल्या चांगल्या घरी भूतबाधा असल्याचं रियाच्या कुटुंबियांनी त्याला सांगितलं आणि याच कारणावरून त्याला राहत घर सोडावं लागलं होतं. याचा मानसिक परिणाम सुशांतवर झाला होता. त्यानं ते चांगलं घर सोडून मुंबई एअरपोर्टच्या जवळ एका रिसॉर्टमध्ये राहायला भाग पाडलं होतं.
रिया चक्रवर्ती सुशांतला सतत तू वेड लागल्यासारखं काही तरी बडबडत असतो, तुझ्या डोक्यावर परिणाम झालायं,  तुला चांगल्या डॉक्टरांची गरज आहे… असं सतत त्याला सुशांत ला सांगितलं जायचं. यानंतर सुशांतची बहिण त्याला भेटण्यासाठी मुंबईत आली होती. सुशांतला पुन्हा पाटण्याला चल असंही ती त्याला म्हणाली होती. परंतु रियाच्या कुटुंबियांनी मुंबईत राहण्यासाठी दबाव टाकला त्याला घरी जाऊ दिलं नाही, असं सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी त्याच्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
रिया चक्रवर्तीनं सुशांतला औषधांचा ओव्हरडोस दिल्याचंही या एफआयआरमध्ये म्हटलं गेलं आहे. सुशांत सिंह राजपूतवर उपचार करण्यासाठी रिया त्याला घेऊन तिच्या मुंबईतील घरी गेली होती आणि तिथं तिनं त्याला औषधांचे ओव्हरडोस दिले. त्यादरम्यान सुशांतला डेंग्यू झाला आहे असे रियानं सर्वांना सांगितलं होतं परंतु त्याला डेंग्यू हा झालाच नव्हता. आणि याच दरम्यान रियाच्या कुटुंबियांनी सुशांतच्या सर्वच गोष्टींवर ताबा मिळवला, असा गंभीर आरोप रिया आणि तिच्या कुटुंबियांच्या वर करण्यात आला आहे.
रिया चक्रवर्ती सुशांतच्या आयुष्यात आल्यानंतर त्याचं फिल्मी करिअर देखील अडचणीत आलं होतं असाही गंभीर आरोप करण्यात आले आहे. रिया सुशांत सिंह राजपूत ला आलेल्या चित्रपटांच्या ऑफर मध्ये तिला काम असेल तयारच ती हो म्हणायला सांगायची. तसेच सुशांतचे मॅनेजर हि ती बदलून तिथे स्वतःच्या मर्जीतील लोकांना तिनं नेमला होता, अशा आरोप सुशां सिंह राजपूत च्या वडिलांनी रिया व तिच्या कुटुंबीय वर केला आहे.  
सुशांत सिंह राजपूत च्या बॅंक अकाऊंटमध्ये तब्बल १७ कोटींची रक्कम होती. पण रिया चक्रवर्ती आयुष्यात आल्यानंतर काही दिवसांतच त्याच्या अकाऊंटमधून १५ कोटी इतकी रुपयांची रक्कम गायब झाली. आणि ही रक्कम अशा काही खात्यांमध्ये जमा झाली आहे ज्याचा सुशांत सिंह राजपूत शी काडीचाही  संबंध नव्हता. तसंच रिया न त्याचं घर सोडताना त्याचं सर्व डेबिट आणि क्रेडिट कार्ड, काही दागिने आणि महत्त्वाची कागदपत्र ही घरातून लंपास केली आहेत, असा थेट आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर केला आहे.

व्हायरल झाला फॉरेन्सिक चाचणीचाही व्हिडिओ : 

सध्या रिया चक्रवर्ती विरोधातील एफआयआर ची कॉपी सोशल मीडियावर सर्व कडे व्हायरल होत आहे आणि एवढंच नाही तर सुशांतच्या फॉरेन्सिक चाचणीचा व्हिडिओही टाइम्स नाउच्या हाती लागला आहे. हा व्हिडिओ सध्या ऑनलाइन खूप व्हायरल होत आहे. यात अधिकारी स्पष्ट शब्दात म्हणतो की, व्हिडिओ लिक होता कामा नये, नाहीतर आपला सगळा तपास व्यर्थ होईल. सुशांत सिंह राजपूत च्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाचे अनेक फोटोस आणि व्हिडिओस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता त्याच प्रमाणे फॉरेन्सिक चाचणीचाही व्हिडिओ समोर आला आहे. 
सध्या वायरल होत असणाऱ्या विडिओ ची तपासणी चालू आहे.  )
इथे पाहा व्हिडिओ- 

Video Credit : Zoom Youtube Channel

सुशांतच्या कंपन्यांचीही होणार चौकशी :

रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूतचे वडील आणि बहिणीचा नवरा हे दोघे मुंबई पोलिसांच्या जॉइन्ट सीपी (लॉ अँड ऑर्डर) यांनाही भेटले होते. पण सुरुवातीला रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयाने आत्महत्येला प्रवृत्त केलेचा अशा प्रकारचा संशय असल्याचा त्यांनी कधीच उल्लेख केला नव्हता. मुंबई पोलीस अजूनही सुशांत सिंह राजपूत च्या तीन कंपन्यांची चौकशी करत आहे. यातील काही कंपन्यांमध्ये रिया आणि तिच्या भावाची भागीदारीही होती तर सर्व कंपन्यांवर सुशांतनेच सारा खर्च केला आहे असे म्हटले गेले आहे. पोलिसांच्या रिपोर्टनुसार सुरुवातीला रियाच्या भावाची याबाबत चौकशी करण्यात येणार होती. कारण दोघांनी मिळून कंपनी स्थापन केली असल्याचं दाखवण्यात आलं आहे. 

सर्वात महागडा वकील लढणार रिया चक्रवर्तीची केस :

देशभरात सध्या सुशांत सिंह राजपूत च्या केसकडे लक्ष आहे. मंगळवारी सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी रिया चक्रवर्ती विरोधात बिहार मध्ये एफआयआर दाखल केल्यानंतर अचानक या केसला वेग आल्याचं दिसलं. यासोबतच रियाने आता तिची बाजू मांडण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या आणि महागड्या वकिल म्हणून ओळख असणारे श्री. मानेशिंदे यांची नियुक्ती केली आहे आणि आता तिची ही केस लढणार आहेत. याआधी श्री. मानेशिंदे यांनी सलमान खान याची ९९८ मधील काळवीट शिकार प्रकरण  आणि संजय दत्तची १९९३ मधील मुंबंई साखळी हल्ला केस मध्ये वकिली केली होती.
 

सुशांतच्या वकिलांचा पोलिसांबाबत धक्कादायक खुलासा :

सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांच्या वकील वकील विकास सिंह यांनी एफआयआर दाखल करण्यात एवढा उशीर का झाला याचं स्पष्टीकरण देताना अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत ते म्हणाले कि, केस दाखल करण्यास ४४ दिवसांचा कालावधी फक्त याचसाठी लागला की, मुंबई पोलीस एफआयआर नोंदवून घेत नव्हती. याशिवाय पटणा पोलिसही पटकन तयार झाली नाही. मात्र मुख्यमंत्री नीतिश कुमार आणि मंत्री संजय झा यांच्या मध्यस्थीनंतर एफआयआर दाखल करण्यात आली.

सुशांतसिंह राजपूतच्या बहिणीनेही केली न्याय मिळवण्याची मागणी : 

सुशांतसिंह राजपूतच्या बहिणीने श्वेता सिंहनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. 

रियानं केली होती सुशांत ला न्याय मिळवण्याची सीबीआय चौकशीची मागणी : 

रिया चक्रवर्तीनं केली सीबीआय चौकशीची मागणी रियानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अमित शहा सर, मी सुशांतची गर्लफ्रेंड. सुशांतच्या अकस्मात निधनाला आता एक महिना होऊन गेलाय. माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. सुशांत सिंह राजपूत ला न्याय मिळावा यासाठी हात जोडून विनंती करते की, या प्रकरणाची सीबीआय द्वारे तपास करण्यात यावा. मला फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे ती म्हणजे सुशांतवर अशा कोणत्या प्रकारचा दबाव होता ज्यामुळं त्यानं इतकं टोकाचं पाऊल उचललं आहे’, असं रियानं तिच्या सोशल मीडिया  पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Social Media Post: 16 July 2020 | Credit : R
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *