सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी लातूर येथे आज मुलाखतींचे आयोजन | ‘जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे आयोजन | Jobs in Latur

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांचे आवाहन

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी लातूर येथे आज मुलाखतींचे आयोजन | ‘जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे आयोजन | Jobs in Latur

लातूर,दि.09 : नोकरीसाठी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खासगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याला रोजगार मोहीम अर्थात ‘जागेवरच निवड संधी’चे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत 10 मे 2023 रोजी लातूर येथे मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी कळविले आहे.

लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र हे कार्यालय वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित करून, सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करते. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘जागेवरच निवड संधी’ उपक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात विविध पदांसाठी वेगवेगळ्या पात्रतेच्या नोकरभरतीची गरज असलेल्या उमेदवारांना थेट प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी निमंत्रित करण्यात येईल. प्रत्यक्ष मुलाखत देऊन पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी मिळेल.

 नोकरीसाठी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खासगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याला रोजगार मोहीम अर्थात ‘जागेवरच निवड संधी’चे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत 10 मे 2023 रोजी लातूर येथे मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी कळविले आहे.

लातूर येथे होणाऱ्या मुलाखतीद्वारे लातूर येथील दरेकर इव्हेंट प्रा.लि. मध्ये कम्प्युटर ऑपरेटर, मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर, अकाऊंट पदाच्या 10 जागांसाठी भरती होणार असून कोणतीही पदवी असलेले उमेदवार यासाठी पात्र आहेत. लातूर येथीलच इक्विनॉक्स टेक्नॉलॉजीमध्ये टेक्निशियन, सेल्सपर्सन, सेल्स मॅनेजरच्या 10 जागांसाठी भरती होणार असून इयत्ता दहावी, बारावी किंवा पदवीधारक यासाठी पात्र आहेत.

म्हास्वयंम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवार, 10 मे 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयासमोर, लातूर, येथे स्वखर्चाने मुलाखतीसाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे स्वत:चा बायोडाटा, रिझ्युम, पासपोर्ट फोटोसह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी 02382-299462 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment