सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थांकडून प्रस्ताव मागविले | 10 जानेवारी अंतिम मुदत
वाशिम, दि. 01 जानेवारी 2023 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सोसायट्यांना कंत्राटी तत्वावर काम वाटप करण्याच्या दृष्टीने 10 जानेवारी 2023 पर्यंत प्रस्ताव मागविले आहे. काम वाटप समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगाराच्या सेवा सोसायट्यांना कंत्राटी तत्वावर काम वाटप करण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्हयातील शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, वाशिम येथील सफाई कामगार १ पद, जिल्हा क्रीडा संकुल समिती येथील लिपीक १ पद व संगणक चालक १ पद ही पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहे.
तरी जिल्हयातील इच्छुक व पात्र आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार सेवा सोसायटी यांनी विहीत अटी व शर्तीच्या अधिन राहून सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत, खोली क्र. ११, काटा रोड वाशिम येथे 10 जानेवारी 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा.
प्रस्ताव सादर करण्याकरीता अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहे. बेरोजगार सेवा संस्था स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी ही कायदा १९६० अन्वये नोंदणीकृत असावी. संस्था कार्यरत असल्याचे जिल्हा उपनिबंधक व सहायक निबंधकाचे सहकारी संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. संस्थेतील सदस्य क्रीयाशील असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक. प्रस्ताव सादर करणाऱ्या संस्थेचा आर्थिक वर्ष २०२१-२२ चा लेखा परिक्षण अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. सुशिक्षित बेरोजगार संस्थेची नोंदणी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,या कार्यालयास असणे आवश्यक आहे. बेरोजगार सेवा सोसायटी संबंधात वेळोवेळी निर्गमित झालेले शासन निर्णय विचारात घेण्यात येतील. सुशिक्षीत बेरोजगार संस्थेला कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. संस्थेचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत किंवा अर्बन कॉ-बँकेत असणे बंधनकारक आहे आणि सुशिक्षीत बेरोजगार संस्था सभासदाचे सेवायोजन कार्ड चालु स्थितीत असणे आवश्यक आहे.
काही अडचणी असल्यास कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष माहिती घ्यावी. असे आवाहन काम वाटप समिती सदस्य-सचिव तथा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.