सॅमसंग गॅलेक्सी A21s स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात ||Price Reduce for Samsung Galaxy A21s
सॅमसंगने भारतात आपला गॅलेक्सी A21s स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. कंपनीने फोनच्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनच्या किंमतीत साधारण १ हजार रुपयांची कपात केली आहे. तर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत आधी इतकीच ठेवली आहे.
फोनची किंमत या फोनच्या किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर ६ जीबी रॅम फोनची किंमत १७ हजार ४९९ रुपये झाली आहे. आधी या फोनची किंमत १८ हजार ४९९ रुपये होती. तर ४ जीबी रॅम फोनची किंमत १६ हजार ४९९ रुपये आहे. या फोनच्या किंमतीत कपात करण्यात आल्याची माहिती मुंबईचे रिटेलर महेश टेलिकॉमने ट्विटरवर दिली आहे. कंपनीने अधिकृतपणे या कपातीची घोषणा केली नाही.
सॅमसंग गॅलेक्सी ए२१एस (Samsung Galaxy A21s) चे वैशिष्ट्ये
- सॅमसंग गॅलेक्सी ए२१एस स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी ओ डिस्प्ले दिला आहे.
- सॅमसंग गॅलेक्सी ए२१एस चा रिझॉल्यूशन 720×1,600 पिक्सल आहे. स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर काम करतो.
- सॅमसंग गॅलेक्सी ए२१एस या फोनमध्ये ऑक्टाकोर Exynos 850 प्रोसेसर आणि ६ जीबी रॅम पर्यंत तसेच ६४ जीबी स्टोरेज मिळतो.
- सॅमसंग गॅलेक्सी ए२१एस फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर सेटअप दिला आहे.
- सॅमसंग गॅलेक्सी ए२१एस रियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स मिळतो.
- सेल्फीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए२१एस या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
- सॅमसंग गॅलेक्सी ए२१एस फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,000mAh ची बॅटरी दिली आहे.
- तसेच सॅमसंग गॅलेक्सी ए२१एस फोनला फास्ट चार्जिंग साठी 15W फ़ास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
- सॅमसंग गॅलेक्सी ए२१एस फोनला हा फोन तीन रंगात उपलब्ध आहे.
- सॅमसंग गॅलेक्सी ए२१एस फोनमध्ये चार रियर कॅमेरे, 15W फ़ास्ट चार्जिंग सोबत 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
या फोनला जून मध्ये लाँच करण्यात आले होते.
महेश टेलिकॉम ह्या (Samsung Galaxy A21s) फोन संदर्भातील ट्विट आपल्या माहितीसाठी –
#PriceDrop
New MOP#SamsungA21s (6/64) Rs.17499/-#SamsungA31 (6/64) Rs.20999/- pic.twitter.com/4M5jPqIGwG— Mahesh Telecom (@MAHESHTELECOM) July 20, 2020
#PriceDrop
New MOP#SamsungA21s (6/64) Rs.17499/-#SamsungA31 (6/64) Rs.20999/- https://t.co/aAWpYytKDM— Mahesh Telecom (@MAHESHTELECOM) July 20, 2020