स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करा – सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर
सांगली, दि. 12 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन भत्ता 25 हजार रूपये, निवास भत्ता 12 हजार रूपये तसेच निर्वाह भत्ता 6 हजार रूपये असे एकूण प्रति विद्यार्थी 43 हजार रूपये तसेच वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 5 हजार रूपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रूपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी सन 2023-24 मधील पात्र विद्यार्थ्यांनी दि. 31 जानेवारी 2024 अखेर सहायक आयुक्त, समाज कल्याण, सांगली यांच्याकडे अर्ज त्वरीत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रमुख अटी व शर्ती तसेच निकष पुढीलप्रमाणे – सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालीकेच्या हद्यीतील व हद्यीपासुन 05 कि.मी. परिसरातील महाविद्यालयात शिकत असलेले विद्यार्थी या योजनेस पात्र आहेत. (या व्यतिरिक्त तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित असणारे विद्यार्थी या योजनेस पात्र नाहीत). विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा (जात प्रमाणपत्र आवश्यक). विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी शासकिय वसतीगृह प्रवेश घेण्यास पात्र असावा. दिव्यांग विद्यार्थ्यास (अनु. जाती व नवबौध्द घटकातील) 3 टक्के आरक्षण विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजारपेक्षा जास्त नसावे. अपूर्ण भरलेल्या व अपूर्ण कागदपत्रांसह सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अधिक माहितीसाठी विद्यार्थी सध्या शिकत असलेल्या संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य/मुख्याध्यापक, अधिक्षीका मुलींचे शासकिय वसतिगृह, विश्रामबाग, सांगली फोन नं. 0233-2304367, अधिक्षक मुलांचे शासकिय वसतिगृह, विश्रामबाग, सांगली फोन, नं. 0233-2301414, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली जुना बुधगांव रोड, सामाजिक न्याय भवन, सांगली फोन नं- 0233-2374739 येथे संपर्क साधावा. या योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन श्री. चाचरकर यांनी केले आहे.