हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी 18 व 19 ऑगस्ट रोजी ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन…

हिंगोली, दि. १० ऑगस्ट २०२२ : जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होणच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्या वतीने दि. 18 व 19 ऑगस्ट, 2022 रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी 18 व 19 ऑगस्ट रोजी ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन…


या मेळाव्यात नवभारत फर्टीलाईझर लिमिटेड औरंगाबाद, धूत ट्रान्समिशन औरंगाबाद, एसबीआय लाईफ इन्शूरन्स कंपनी लि.हिंगोली येथील दहावी, बारावी, आयटीय, डिप्लोमा, पदवीधर या शैक्षणिक अहर्तेनुसार 120 हून अधिक रिक्त पदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अप्लॉय करावे. जेणेकरुन त्यांना ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल. आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी व्हावेत. याबाबत काही अडचण आल्यास 9881150352 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त राजपाल कोल्हे यांनी केले आहे.


Join WhatsApp

Join Now

Leave a Comment