मौजे फुलसावंगी, तहसिल-महागाव, जिल्हा यवतमाळ येथील कल्पक व कुशल बुद्धीच्या ध्येयवेड्या “इस्माईल उर्फ मुन्ना” या तरूणाचे काल दिनांक १०/०८/२०२१ रोजी हेलिकॉप्टरच्या helicopter Accident अपघातात निधन झाले.
यवतमाळ जिल्ह्यातील व फुलसावंगी परिसरातील सर्व जण त्याला “हेलिकॉप्टर बॉय” म्हणून ओळखत होते. हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या सहकार्याने व केंद्र शासनाच्या विशेष परवानगीने त्याने स्वखर्चाने भंगारातून स्वतःच हेलिकॉप्टर बनवले. त्याच्या प्रयत्नांना यश आले. त्याने हेलिकॉप्टरचे दहा- दहा मिनिटाचे ट्रायल उड्डाण यशस्वीरीत्या पूर्ण केले.त्याचे स्वप्न साकार झाले. त्याचे सर्वत्र कौतुक होत होते. त्याने तयार केलेल्या हेलिकॉप्टरच्या तंत्रज्ञानास कंपन्या कडून त्याला मोठ्या कमाईची ऑफर मिळाली होती. helicopter Accident
नेहमी प्रमाणे हेलिकॉप्टरच्या ऊडानाची ट्रायल घेत असतांना हेलिकॉप्टरच्या मागिल बाजुने बॅलन्स फॅनचा पत्ता तुटल्याने मोठा कर्णकर्कश आवाज आला. त्याने हेलिकॉप्टरच्या केबिन बाहेर डोकावून पाहिले असता, फॅनचा पाता तुटून त्याच्या डोक्यावर आदळल्याने मेंदुस जोरदार मार लागल्याने त्याचा करूण अंत झाला. helicopter Accident
Munna Helicopter: Yavatmal helicopter Accident – Person dies from helicopter made by himself.