१२ सप्टेंबरला प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थांकडून प्रस्ताव मागविले | 10 जानेवारी अंतिम मुदत

पुणे दि.७: कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून १२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणे येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना ही कुशल कारागिर घडविणारी योजना आहे. देशपातळीवरील आय. टी. आय. उत्तीर्ण व इच्छुक उमेदवारांसाठी जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजीत करण्यात आला असल्याने, या मेळाव्यास आय. टी. आय उत्तीर्ण उमेदवारांनी उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा.

१२ सप्टेंबरला प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

आस्थापनांनी भरती मेळाव्याकरीता https://www.apprenticeshipindia.gov.in >> Apprenticeship Mela किंवा https://dgt.gov.in/appmela2022 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार (तां) यशवंत कांबळे, विकास टेके, तसेच मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अंशकालीन प्राचार्य बी. आर. शिंपले यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment