२८ व्या वर्षी सेलेना गोमेझ आहे अब्जाधीशची मालकीण…आज आहे वाढदिवस || Selena Gomez Birthday

२८ व्या वर्षी सेलेना गोमेझ आहे अब्जाधीशची मालकीण...आज आहे वाढदिवस || Selena Gomez Birthday

२८ व्या वर्षी सेलेना गोमेझ आहे अब्जाधीशची मालकीण…आज आहे वाढदिवस 

पॉप गायक सेलेना गोमेझ (Selena Gomez) आज तिचा २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. सेलेना गोमेझ (Selena Gomez)  ‘गुड फॉर यू’, ‘सेम ओल्ड लव’ आणि ‘बॅक टू यू’ यांसारखी हिट गाणी दिली आहेत ती एक जागतिक दर्जाची उत्तम गायक आहे. २०१३ मध्ये सेलेना गोमेझ (Selena Gomez) ने तिचा पहिला सिंगल अल्बम ‘कम अँड गेट इट’ लॉन्च केला. या ‘कम अँड गेट इट’ ने जगभरात धुमाकूळ घातला होता. सेलेना सर्वातआधी जस्टिन बीबर सोबतच्या रिलेशनशिप मुळे चर्चेत आली होती. ग्लोबल स्टार व गायिका असलेल्या सेलेना गोमेझ (Selena Gomez) च्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टींकडे चाहत्यांचं बारकाईने लक्ष असतं. 
लहान वया पासूनच सेलेना गोमेझ (Selena Gomez) ने यशाची पायरी चढली. सेलेनेचा जन्म २२ जुलै १९९२ मध्ये अमेरिकेत झाला. वयाच्या १७ व्या वर्षी ती यूनिसेफची अँबेसिडर होती. करिअरच्या सुरुवातीला सेलेना गोमेझ (Selena Gomez) ने हॅना मोंटेनामध्येही काम केलं होतं तसेच सेलेना गोमेझ (Selena Gomez) ने तिच्या करिअरची सुरुवात ‘बारनी अँड फ्रेंड्स’ मधील ‘गियाना’ ने केली.  यानंतर सेलेनाने अनेक सिनेमां मध्ये छोटे मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. याच भूमिकां मुळे सेलेना गोमेझ (Selena Gomez) ला सर्वात जास्त जगात प्रसिद्धी मिळाली. 

View this post on Instagram

In the yard, in my @PUMA unity shoes clearly 😊

A post shared by Selena Gomez (@selenagomez) on

जस्टिन बीबरसोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या सेलेना गोमेझ (Selena Gomez) चं काही वर्षांनी ब्रेकअप झालं. यानंतर जस्टिनने हॅली बाल्डविनशी लग्न केलं. सेलेना गोमेझ (Selena Gomez) सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते त्यामुळे सेलेनाने एखादा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आणि तो व्हायरल झाला नाही असं होऊच शकत नाही. जगभरात तिचे कोट्यवधी चाहते आहेत. काही वर्षांपूर्वी सेलेना गोमेझ (Selena Gomez) चं किडनी ट्रान्सप्लान्ट झालं होत आणि यामुळे तिला काही अडचणींचा सामना करावा लागला होता. सेलेना गोमेजला डिझ्नी शो ‘विजर्ड ऑफ वेवर्ली प्लेस’ या शोमधून बालकलाकार म्हणून ओळख मिळाली होती. सेलेना गोमेझ (Selena Gomez) च्या ‘कम अँड गेट इट’, ‘द हार्ट वॉन्ट्स वॉट इट वॉन्ट्स’, ‘बेड लायर’, ‘वुल्फ’ आणि ‘बॅक टू यू’ ही गाणी तिच्या चाहत्यांमध्ये आज ही खूप प्रसिद्ध आहेत.आज वयाच्या २८ व्या वर्षी सेलेना गोमेझ (Selena Gomez)  अब्जाधीश आहे. 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment