३० जानेवारी रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे अहिल्यानगर येथे आयोजन
अहिल्यानगर दि.२२- जिल्ह्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता के.जे. कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्स अहिल्यानगर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांचे उद्योजक सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करणार आहेत. सर्व शाखेतील पदवीधर, आयटीआय ट्रेड व वैद्यकीय (नर्सिंग), इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, संगणक आदी क्षेत्रामध्ये पदविका, पदवी प्राप्त उमेदवारांनी उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर तसेच https://forms.gle/3S1DHFW2Q6FQ1Mbi9 या लिंकवर नोंदणी करुन पात्रतेनुसार उद्योजकांकडे अर्ज करावा.
याबाबत अधिक माहितीसाठी वसीमखान भ्रमणध्वनी क्र. ९४०९५५५४६५, मच्छिंद्र उकिरडे ९५९५७२२४२४, संतोष वाघ ८८३०२१३९७६, बद्रीनाथ आव्हाड ९४२०७२५२८०,योगेश झांजे ९५८८४०८८९० अथवा कार्यालयाच्या ०२४१-२९९५७३५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.