25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन

शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन

सातारा दि.23 जानेवारी २३ (आजचा साक्षीदार): जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा तसेच मतदार नोंदणी अधिकारी 262 सातारा विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने 13 व्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त बुधवार दि. 25 जानेवारी 2023 रोजी दु. 2.00 वा. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सातारा येथे राष्ट्रीय मतदार दिन समांरभ जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

यावेळी उपजिल्हाधिकारी व उपाजिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे, 262 सातारा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी मिनाज मुल्ला, सहा. मतदार नोंदणी अधिकारी राजेश जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment